Home Breaking News जिल्ह्यात एका मृत्यसह 119 जण पॉझेटिव्ह , 66 कोरोनामुक्त

जिल्ह्यात एका मृत्यसह 119 जण पॉझेटिव्ह , 66 कोरोनामुक्त

422
0

यवतमाळ, दि. 13 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 119 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 66 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
मृतकांमध्ये यवतमाळ येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 507 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 119 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 388 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 551 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15123 झाली आहे. 24 तासात 66 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14134 आहे. तर जिल्ह्यात एकूण 438 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 147459 नमुने पाठविले असून यापैकी 147074 प्राप्त तर 385 अप्राप्त आहेत. तसेच 131951 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here