Home Breaking News मंदार सप्रे मित्र मंडळातर्फे ओशिवळे येथे शालेय विद्यार्थिनी साठी सायकल वाटप…..!!!!

मंदार सप्रे मित्र मंडळातर्फे ओशिवळे येथे शालेय विद्यार्थिनी साठी सायकल वाटप…..!!!!

57
0

रत्नागिरी:राजापूर तालुक्यातील ओशीवळे येथे मंदार सप्रे मित्रमंडळ यांच्या मार्फत नुकतेच गावातील शालेय विद्यार्थिनींसाठी सायकलचे वाटप करण्यात आले. गावातील शालेय मुलांना दररोज ३ते४ किलोमिटरची पायपिट करावी लागते. सामाजिक भावनेतून अशा गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले.
यामध्ये मंदार सप्रे मित्रमंडळ तर्फे ५ सायकल व रत्नागिरी जिल्हा परिषदच्या माध्यमातून ३ सायकल अशा एकूण ८ सायकलींचे वाटप करण्यात आले. गेले 2 वर्ष सततच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले.सदर कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा बँक संचालक मनोहरजी सप्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य रुपेश जाधव, सचिन मसुरकर,सौ.अंकिता गुरव यांसह बचतगट महिला व पालक यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य आबा आडीवरेकर, दीपक नागले, अर्बन बँक संचालक प्रसाद मोहरकर, योगेश नकाशे, पंचायत समिती सदस्य प्रतीक मटकर, विहंग खानविलकर जिल्हा परिषदचे माजी उपमुख्यकार्यकारी अधिकारी आरगे साहेब, सौ लिगम मॅडम यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्याचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here