Home Breaking News दोन मृत्युसह जिल्ह्यात 109 जण पॉझेटिव्ह , 78 कोरोनामुक्त

दोन मृत्युसह जिल्ह्यात 109 जण पॉझेटिव्ह , 78 कोरोनामुक्त

143
0

यवतमाळ, दि. 17 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 109 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ येथील 54 वर्षीय पुरुष तर आर्णि येथील 71 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 78 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 657 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 109 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 548 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 641 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15462 झाली आहे. 24 तासात 78 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14380 आहे. तर जिल्ह्यात एकूण 441 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 149260 नमुने पाठविले असून यापैकी 148784 प्राप्त तर 476 अप्राप्त आहेत. तसेच 133322 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here