Home Breaking News जिल्ह्यात एका मृत्युसह 75 जण पॉझेटिव्ह, 53 कोरोनामुक्त

जिल्ह्यात एका मृत्युसह 75 जण पॉझेटिव्ह, 53 कोरोनामुक्त

304
0

यवतमाळ, दि. 21 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 75 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 53 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये कळंब तालुक्यातील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 75 जणांमध्ये 46 पुरुष आणि 29 महिला आहेत. यात यवतमाळातील 40 रुग्ण, पुसद येथील 9, दिग्रस 8, पांढरकवडा 8, दारव्हा 2, बाभूलगांव 2, घाटंजी 2, आर्णी 1, कळंब 1, महागाव 1 आणि उमरखेड़ येथील 1 रुग्ण आहे.
रविवारी एकूण 529 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 75 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 53 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 950 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16045 झाली आहे. 24 तासात 53 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14648 आहे. तर जिल्ह्यात एकूण 447 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 152512 नमुने पाठविले असून यापैकी 151831 प्राप्त तर 681 अप्राप्त आहेत. तसेच 135786 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
00000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here