Home Breaking News अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा ! !

अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा ! !

237
0

मुंबई –  मुख्यमंत्री राठोड यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते . वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले . या बैठकीत शिवसेनेचे बडे नेते हजर होते.

काय आहे प्रकरण? पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी होती. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्तपूर्वी पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास अहवाल येईपर्यंत संजय राठोड यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेऊ नका, अशी विनंती राज्य सरकारला केली आहे.

पण शेवटी वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा सुपूर्द केला व तो त्यांनी मान्यही केला. सूत्रांचा महिती प्रमाणे हे वन खात्याचा प्रभार कबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांना सोपविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here