Home Breaking News जिल्ह्यात तीन मृत्युसह 186 जण पॉझेटिव्ह, 131 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात तीन मृत्युसह 186 जण पॉझेटिव्ह, 131 जण कोरोनामुक्त

148
0

यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 186 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 131 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ येथील 76 वर्षीय पुरुष, महागाव येथील 62 वर्षीय पुरुष आणि मारेगाव तालुक्यातील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या 186 जणांमध्ये 112 पुरुष आणि 74 महिला आहेत. यात यवतमाळातील 82 रुग्ण, पुसद येथील 60, दिग्रस 12, पांढरकवडा 15, वणी 5, दारव्हा 1, घाटंजी 4, महागाव 3, नेर 2, उमरखेड़ 1 आणि 1 इतर रुग्ण आहेत.
रविवारी एकूण 1112 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 186 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 926 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1554 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 17516 झाली आहे. 24 तासात 131 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15500 आहे. तर जिल्ह्यात एकूण 462 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 162899 नमुने पाठविले असून यापैकी 161117 प्राप्त तर 1782 अप्राप्त आहेत. तसेच 143601 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
00000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here