Home Breaking News प्रभाग क्र १७ मधील मोकाट कुत्र्यांची दहशत … करीता निवेदन सादर .

प्रभाग क्र १७ मधील मोकाट कुत्र्यांची दहशत … करीता निवेदन सादर .

109
0

यवतमाळ: प्रभाग क्र १७ या परिसरात भटक्या कुत्र्यांची तब्बल पंधराहून अधिक टोळी सक्रिय झाली आहे. या बाबत हळहळ आणि चिंता व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी असलेली अस्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, नगरपालिकेचा हलगर्जीपणा आणि अतिरेकी यामुळे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला नारिकांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत आहे. पालिकेकडून फारशी कारवाई झाल्याचे दिसत नाही. गल्लोगल्ली टोळ्याटोळ्यांनी फिरणाऱ्या, दहशत माजवणाऱ्या या कुत्र्यांच्या समस्येबद्दल चिंता वाढत आहे.

नगरपालिकेने थांबवलेली मोकाट कुत्रे मोहीम आणि कचऱ्याच्या साम्राज्यामुळे प्रभाग क्र १७ मधील परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. अस्वच्छ परिसरात कुत्र्यांना सहज खाद्य उपलब्ध होते. कुत्र्यांची वाढलेली संख्या ही केवळ डोकेदुखीच नाही तर भयावह वाटणारी बाब ठरू लागली आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटू लागली आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रस्त्यावर कसेही आणि कुठेही वेगाने पळणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार पडून ते गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना परिसरात घडलेल्या आहेत. कचरा आणि अस्वच्छता यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. नगरपालिकेने कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम राबविली होती. ती थंडावल्यानंतर कुत्र्यांच्यी संख्या वाढल्याचे दिसत आहे. रस्त्यावर कुठेही टाकण्यात येणार कचरा, त्यातील पदार्थ, मासांचे तुकडे, हाडे यांच्यामुळे कुत्र्यांना आयते खाद्य उपलब्ध होत असल्याने परिसरात कुठेही कुत्रे नजरेस पडत असतात. शिवाजी नगर व वीर वामनराव चौक या सर्व परिसराचा विचार केल्यास मोकाट कुत्र्यांची संख्या १०० च्यावर भरेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.

कुत्र्यांची संख्या वाढण्यास रस्त्यावर कुठेही कचरा टाकणे हे प्रमुख कारण आहे. या कचऱ्यात खाद्यपदार्थही असल्यामुळे कुत्र्यांना आयते खाद्य मिळत असल्याने कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कचरा उघड्यावर टाकणे बंद केल्यास कुत्र्यांच्या संख्येवर निश्चित आळा बसू शकेल

नगरपालिकेची श्वान निर्बीजीकरणाची मोहीम थंडावल्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. नागरिकांकडून कुत्र्यांचा त्रास वाढल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेने बंदोबस्त करायला हवा. सकाळी ७ ते १० आणि रात्रीच्या वेळी या मोकाट कुत्र्यांचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या वेळेत मोकाट कुत्र्यांच्या टोळ्याच फिरत असतात. त्यामुळे वॉकला, नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडणारे व लहान मुले, वृध्द, महिला, मोटारसायकल चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा कुत्रे पाठलाग करून चावा घेतात. त्यामुळे नगरपालिकेने व आरोग्य विभागाने त्वरित दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या करिता या.मुख्यधिकारी साहेब व आरोग्य सभापती यांना अंकुश पांडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी अमित पांडे, प्रथमेश देशपांडे, अमेय पांडे, अनुप खोडवे, अमित क्षिरसागर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here