Home Breaking News आणीबाणी ही कॉंग्रेसने केलेली चूक: राहुल गांधी

आणीबाणी ही कॉंग्रेसने केलेली चूक: राहुल गांधी

61
0

नवी दिल्ली | 25 जून 1975ला लागू करण्यात आलेली आणीबाणी ही तत्कालीन काँग्रेस सरकारची म्हणजेच इंदिरा गांधींची चूक होती. अशी कबुली काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षातर्फे पहिल्यांदाच अशा प्रकारची कबुली आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
काँग्रेस पक्षाने कधीही या गोष्टीचा वापर केला नाही असंही ते यावेळी म्हटले आहेत. जे झालं आहे आणि जे होत आहे त्यात खूप मोठा फरक आहे. असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. लोकसभेत बोलायला परवानगी नाही, न्यायव्यवस्थेकडून तर काही आशाच नाही आणि भाजपकडे मोठी आर्थिक ताकद आहे. अशाप्रकारे त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
सध्याच्या सरकारमुळे लोकशाही धोक्यात येत आहे आणि बडे व्यावसायिक त्याचा फायदा करून घेत आहेत. काँग्रेस पक्षाने कधीही असा बड्या उद्योजगांचा किंवा काही विशिष्ट संस्थांचा वापर करून घेतला नाही. त्यामुळे जे होतंय ते अत्यंत चिंताजनक असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. पुद्दूचेरी मध्ये उपराज्यपाल यांनी काही बिल पारित होऊ दिले नाही. कारण, त्या आरएसएसशी संबंधित होत्या. असा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे.
आमच्या म्हणजेच विरोधी पक्षाच्या बाजूने कोणताही व्यावसायिक उभा राहू शकत नाही. अशी परिस्थिती या सरकारने उपस्थित केली आहे. असंही ते यावेळी बोलताना म्हटले आहेत. आणीबाणीवरून कायमच काँग्रेस पक्षावर टीका होत आली आहे. परंतु, काँग्रेसतर्फे आत्तापर्यंत कधीही त्याच्यावर एवढी मोठी प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. इंदिरा गांधी यांचे नातू आणि काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय गोटात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here