Home Breaking News जिल्ह्यात पाच मृत्युसह 470 पॉझेटिव्ह , 206 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात पाच मृत्युसह 470 पॉझेटिव्ह , 206 जण कोरोनामुक्त

353
0

यवतमाळ, दि. 14 : गत 24 तासात जिल्ह्यात पाच मृत्युसह 470 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 206 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 74, 85 आणि 77 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 71 वर्षीय महिला तसेच 65 वर्षीय पुरुष आहे. रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 470 जणांमध्ये 326 पुरुष आणि 144 महिला आहेत. यात यवतमाळातील 162, पुसद 71, दिग्रस 72, दारव्हा 45, महागाव 32, नेर 18, बाभुळगाव 16, आर्णि 12, पांढरकवडा 11, उमरखेड 9, वणी 7, कळंब 5, घाटंजी 3, राळेगाव 3, मारेगाव 1 आणि इतर ठिकाणचे 3 रुग्ण आहे.
रविवारी एकूण 4327 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 470 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3857 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2736 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 21735 झाली आहे. 24 तासात 206 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 18493 आहे. तर जिल्ह्यात एकूण 506 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 187794 नमुने पाठविले असून यापैकी 185575 प्राप्त तर 2219 अप्राप्त आहेत. तसेच 163840 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here