Home Breaking News उपजिल्हाधिकाऱ्याना मुस्लिम समाजाचा शिष्टमंडळाचे निवेदन …

उपजिल्हाधिकाऱ्याना मुस्लिम समाजाचा शिष्टमंडळाचे निवेदन …

46
0

यवतमाळ : उपजिल्हाधिकारी यांना भेटून मुस्लिम समाजाच्या शिष्ट मंडळाने वसीम रिजवी याने मुस्लिम समाजाच्या पवित्र ग्रंथ कुराण शरीफ बद्दल केलेल्या अभद्र अश्या टिप्पणी बद्दल उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब, मा.राज्यपाल साहेब, मा. पंतप्रधान साहेब व मा. राष्ट्रपती साहेब यांना निवेदन पाठवण्यात आले.या निवेदना मध्ये मुस्लिम समाजाच्या शिष्ट मंडळाने वसीम रिजवि या वर अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे ज्यामुळे भविष्यात पुन्हा असा प्रकार करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही या घटने वरून समाजातील लोकांचे मन खूप दुखावले गेलेले आहे, वसीम रीजवी अश्या प्रकारच्या भ्रष्ट बुध्दी लोकांमुळे समाजात असंतोष पसरतो असे मत ही यावेळी व्यक्त करण्यात आले यावेळी सिकंदर भाई शाह, मोहसीन खान, वसीम भाई, नाईम पहेलवान, जफर मिर्जा, रेहान अहेमद, नदीम शेख, इमरान सर, वसीम शाह आणि राशिद अन्वर आदी लोक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here