Home Breaking News सात जणांचा मृत्यु तर 325 नव्याने पॉझेटिव्ह.

सात जणांचा मृत्यु तर 325 नव्याने पॉझेटिव्ह.

232
0

यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवशी 1007 जण कोरोनामुक्त झाले होते तर आज (दि. 18 मार्च) 695 जणांनी कोरोनावर मात केली. गत दोन दिवसात बरे झालेल्या जवळपास 1702 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गुरुवारी जिल्ह्यात आढळलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणा-यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात सात जणांचा मृत्यु झाला असून 325 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 66, 62 आणि 43 वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, पुसद येथील 65 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 83 वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील 75 वर्षीय पुरुष आहे. गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 325 जणांमध्ये 274 पुरुष आणि 51 महिला आहेत. यात यवतमाळातील 105, पुसद 54, दिग्रस 38, उमरखेड 37, आर्णि 14, पांढरकवडा 13, नेर 12, राळेगाव 12, घाटंजी 11, वणी 11, महागाव 8, दारव्हा 5, बाभुळगाव 2, कळंब 1 आणि इतर ठिकाणचे 2 रुग्ण आहे.
गुरुवारी एकूण 4884 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 325 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4559 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2041 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 23214 झाली आहे. 24 तासात 695 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 20642 आहे. तर जिल्ह्यात एकूण 531 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 215159 नमुने पाठविले असून यापैकी 205870 प्राप्त तर 9289अप्राप्त आहेत. तसेच 182656 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले
आहे.
००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here