Home Breaking News रेल्वेमार्गाचे निकृष्ट काम करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाका : खा. भावना गवळी

रेल्वेमार्गाचे निकृष्ट काम करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाका : खा. भावना गवळी

86
0

यवतमाळ, ता. २३ : यवतमाळ-वर्धा-नांदेड या रेल्वेमार्गावरील निर्माणाधीन पूल कोसळला, मात्र याप्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. सदर रेल्वेमार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने संबंधित कंपन्यांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी खासदार भावना गवळी (पाटील) यांनी संसदेत केली आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे तर होत नाही ना, असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.

खासदार भावना गवळी (पाटील) यांनी काल, सोमवारी (ता. २२) “जनहीताचे महत्वाचे मुद्दे” या तासात तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, 2010 मध्ये यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वेला परवानगी मिळाली होती. तेव्हापासून हे काम खूपच संथगतीने सुरू होते. परंतु जेव्हा प्रधानमंत्री 2014 मध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, तेव्हापासून या प्रकल्पाला गती मिळाली आहे. सध्या या रेल्वेमार्गाचे काम मध्य रेल्वेकडून केले जात आहे. हैदराबाद येथील ‘हर्षदा’ व ‘आरबीआर’ या दोन कंपन्या काम करीत आहेत. या रेल्वेमार्गावरील निर्माणाधीन पूल कोसळला तरी त्याची चौकशी करण्यात आली नाही. अतिशय महत्त्वाच्या अशा रेल्वेमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असताना मध्य रेल्वेचे अधिकारी संबंधित कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचे खासदार गवळी (पाटील) यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी कोसळलेल्या पुलाची चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या ‘हर्षदा’ व ‘आर बी आर’ या दोन्ही कंपन्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी यावेळी केली. रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालयाने ही बाब जनहीताचे असल्याने व या कामात भ्रष्टाचार होत असल्याने या दोन्ही कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, अशी मागणीही खासदार भावना गवळी (पाटील) यांनी केली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालय काय कारवाई करते याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here