Home Breaking News गावातील विकासकामे लवकरच पूर्ण करू : आमदार नामदेव ससाने यांचे प्रतिपादन, दहिसावळी...

गावातील विकासकामे लवकरच पूर्ण करू : आमदार नामदेव ससाने यांचे प्रतिपादन, दहिसावळी येथे वृक्षारोपण कार्यक्रम

107
0

बातमीदार

राजू गवळी

दहिसावळी/7218109910

 

नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांसह योग्य रस्ते, विज, पाणी, स्मशानभूमी सौंदर्यीकरणासह अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. रखडलेली विकासकामे लवकर पूर्ण करील. शिवाय येणा-या काळात नागरिकांच्या समस्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे आश्‍वासन उमरखेड—महागाव विधानसभा क्षेत्रातील आमदार नामदेव ससाने यांनी दिले. ते महागाव तालुक्यातील दहिसावळी येथे विर लहूजी बहुउद्देशीय संस्थातर्फे सोमवारी (ता.१४) घेण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते.

 

यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एनजीओ फंड यवतमाळचे जिल्हाध्यक्ष शेवंतराव गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार नामदेव ससाने उपस्थित होते. दहिसावळी येथील पोलिस पाटील दिगांबर ठाकरे, माजी सरपंच महाली, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील, पानोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, ग्रामस्थांना वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन सतीश गादेवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भांडवले सर यांनी तर आभार संस्थेचे सचिव राजू गवळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विर लहूजी बहुउद्देशीय संस्थेचे प्रकाश लोंढे, संतोष गायकवाड, रमेश लोंढे, राधेश्‍याम लोंढे, चिंतामण लोंढे, मनोहर लोंढे, संजय गवळी, अवधुत गवळी, लखन गवळी, प्रदीप सुरोशे, संतोष सुरोशे, सुनील सुरोशे, विजय लोंढे, श्रीकांत गोडंबे आदी उपस्थित होते. यावेळी गावातील सर्व नागरिक, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here