Home Breaking News आठ मृत्युसह 440 जण पॉझेटिव्ह, 246 जण कोरोनामुक्त

आठ मृत्युसह 440 जण पॉझेटिव्ह, 246 जण कोरोनामुक्त

406
0

यवतमाळ, दि. 24 : गत 24 तासात जिल्ह्यात आठ मृत्युसह 440 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 246 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 37, 70, 80 वर्षीय पुरुष आणि 67 वर्षीय महिला, दारव्हा येथील 66 वर्षीय महिला, उमरखेड येथील 78 वर्षीय महिला, किनवट (जि. नांदेड) येथील 70 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 76 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.24) पॉजिटिव आलेल्या 440 जणांमध्ये 339 पुरुष आणि 101 महिला आहेत. यात यवतमाळातील 231, दिग्रस 35, पुसद 35, नेर 27, उमरखेड 22, बाभुळगाव 19, पांढरकवडा 14, घाटंजी 12, राळेगाव 11, दारव्हा 9, कळंब 7, महागाव 6, वणी 6, आर्णि 3 आणि झरीजामणी येथील 3 रुग्ण आहे.
बुधवारी एकूण 5188 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 440 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4748 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2411 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 25836 झाली आहे. 24 तासात 246 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 22834 आहे. तर जिल्ह्यात एकूण 591 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 243753 नमुने पाठविले असून यापैकी 233658 प्राप्त तर 10095 अप्राप्त आहेत. तसेच 207822 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here