Home Breaking News आज जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा स्फोट. तब्बल 654 रुग्ण तसेच 5 जणांचा म्रुत्यु...

आज जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा स्फोट. तब्बल 654 रुग्ण तसेच 5 जणांचा म्रुत्यु …

321
0

यवतमाळ, दि. 1 : गत 24 तासात जिल्ह्यात पाच मृत्युसह 654 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 288 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 70 वर्षीय पुरुष आणि 60, 70 व 81 वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज (दि. 1) पॉझेटिव्ह आलेल्या 654 जणांमध्ये 431 पुरुष आणि 223 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 237 जण पॉझेटिव्ह, उमरखेड 81, दिग्रस 53, पुसद 52, आर्णि 40, कळंब 36, पांढरकवडा 35, दारव्हा 34, घाटंजी 19, वणी 19, महागाव 10, नेर 10, बाभुळगाव 8, झरीजामणी 8, मारेगाव 6, राळेगाव 3 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.
गुरुवारी एकूण 5998 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 654 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5344 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2850 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1241 तर गृह विलगीकरणात 1609 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 29231 झाली आहे. 24 तासात 288 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 25721 आहे. तर जिल्ह्यात एकूण 660 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 273032 नमुने पाठविले असून यापैकी 268042 प्राप्त तर 4990 अप्राप्त आहेत. तसेच 238811 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here