Home Breaking News लहान व्यापारी व एकल दुकानदारांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ; पराग पिंगळे...

लहान व्यापारी व एकल दुकानदारांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ; पराग पिंगळे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे..

39
0

यवतमाळ: मागील वर्षी कोरोनाचे भारतात आगमन झाल्यावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वदूर लॉकडाऊन केला होता.हा लॉकडाऊन जवळपास बावन दिवस सुरू होता.त्या काळात व्यापाऱ्यांची आवक पूर्णपणे ठप्प झाली होती.त्यामुळे गेले वर्षभर व्यापारी त्यातून सावरू शकलेला नाही.दुकानांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार,दुकान भाडे, कर्जावरील व्याज हे व्यापाऱ्यांना व्यापार बंद असून देखील मागील वर्षी भरावे लागले.पण ते कसेतरी व्यापाऱ्यांनी सहन केले.
पण आता कुठे हे आर्थिक वर्ष संपताना व खर्चाचा ताळमेळ नुकताच बसत असतांना पुन्हा लॉकडाऊन झाल्याने व्यापारी पुरता खचला आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा सहनभूतीपूर्ण विचार करून सोमवार ते शुक्रवार काही काळ किंवा एक दिवस आड तरी दुकाने काही वेळ उघडण्याची परवानगी द्यावी. शुक्रवारी सायंकाळ ते सोमवार सकाळ संचार बंदी केल्यास त्यास व्यापारी विरोध करणार नाही सहकार्याच करतील.अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील छोट्या व्यापाऱ्यांतर्फे व एकल दुकांदारातर्फे शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन हा जास्त घातक आहे व त्यामुळे कुटुंबचे कुटुंब कोरोना ग्रस्त होत आहे.रुग्णांचे प्रमाण इतके वाढले आहे त्यामुळे येत्या काळात आरोग्य सेवा कोलमडू शकते.आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे त्याच मार्गावर आज केरळ,छत्तीसगढ,राजस्थान,कर्नाटक,मध्यप्रदेश व दिल्ली ही राज्य देखील जात आहेत.त्यामुळे माननीय मुख्यमंत्री यांची काळजी रास्त आहे.आपण कोरोनाची चेन जर तोडली नाही तर रुग्णासाठी येत्या काळात बेड,व्हेंटिलेटर आणि अक्सिजन ची कमतरता भासणार आहे हे देखील व्यापाऱ्यांना समजते आहे.त्यामुळे कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करून काही काळ दुकाने उघडण्याची परवानगी आपण द्यावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.व्यापारी आपली जबाबदारी ओळखून भविष्यात दुकानांमध्ये गर्दी होऊ देणार नाही त्यामुळे ह्या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली केली आहे.

महाराष्ट्रातील व्यापारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोबत

लॉकडाऊन किंवा बंधने ही तात्पुरती व्यवस्था आहे.त्यामुळे महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार व्हावा व राज्याची आर्थिक घडी पुन्हा बसावी अशीच व्यापाऱ्यांची भावना आहे.ह्या लढाईत व्यापारी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोबत आहे.विरोधी पक्ष हे उघडा ते उघडा असे म्हणतात आणि दुसरी कडे कोरोना वाढला तर राज्य सरकार ला जबाबदार धरतात.त्यामुळे विरोधकांना गंभीरतेने घेण्याची आवश्यकता नाही.महाराष्ट्र हा भारतातच असल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राजकारण न करता केंद्राकडून सुद्धा जबाबदारी घेऊन लस मिळवण्यात पुढाकार घ्यावा व आर्थिक बाबतीत पॅकेज महाराष्ट्राला मिळवून द्यावे.शेवटी महाराष्ट्र आपले हक्काचे मागतोय कारण केंद्र सरकारला ह्या महाराष्ट्रातील जनता कर स्वरूपात सर्वात जास्त निधी देत असते त्यामुळे महाराष्ट्र सरकार बरोबरच केंद्र शासनाची सुद्धा ह्या आणीबाणी मध्ये समान जबाबदारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here