Home Breaking News जिल्ह्यात 22 मृत्युसह 906 नव्याने पॉझेटिव्ह , 510 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात 22 मृत्युसह 906 नव्याने पॉझेटिव्ह , 510 जण कोरोनामुक्त

290
0

यवतमाळ, दि. 15 : गत 24 तासात जिल्ह्यात 22 मृत्युसह 906 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 510 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सर्व 22 जणांचे मृत्यु हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले असून मृतांमध्ये यवतमाळ येथील 42, 72, 74 वर्षीय पुरुष व 60, 68, 68वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 74 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, पुसद तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 63 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 37 व 46 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 60 वर्षीय महिला, कळंब येथील 54 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 60 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, वणी येथील 35, 55, 72 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 46 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 30 वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 906 जणांमध्ये 574 पुरुष आणि 332 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 315 पॉझेटिव्ह रुग्ण, दिग्रस 126, पुसद 124, उमरखेड 80, पांढरकवडा 42, घाटंजी 30, मारेगाव 30, वणी 28, आर्णि 27, महागाव 25, दारव्हा 19, नेर 19, बाभुळगाव 12, कळंब 10, झरीजामणी 10, राळेगाव 4 आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे.
गुरुवारी एकूण 3900 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 906 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2994 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4436 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2302 तर गृह विलगीकरणात 2134 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 37287 झाली आहे. 24 तासात 510 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 32034 आहे. तर जिल्ह्यात एकूण 817 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.39 असून मृत्युदर 2.19 आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 327350 नमुने पाठविले असून यापैकी 325103 प्राप्त तर 2247 अप्राप्त आहेत. तसेच 287816 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here