Home Breaking News कांदा उत्पादकांवरील अन्याय दूर करा : जिल्हा काँग्रेस कमेटीची मागणी

कांदा उत्पादकांवरील अन्याय दूर करा : जिल्हा काँग्रेस कमेटीची मागणी

168
0

तहसीलदारांना निवेदन सादर

यवतमाळ : देशाचा आर्थिक कणा असलेला शेतकरी डबघाईस आला आहे. कधी निसर्गाच्या चक्रव्‍यूहात तर कधी मानवनिर्मित संकटाने अशातच केंद्र सरकारतर्फे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा शेतकऱ्यांविरोधी निर्णय असून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येणार आहेत. या निर्णयाचा निषेध करीत जिल्हा काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीतर्फे बुधवार (ता. १६) तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतीकडे निवेदन दिले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात भाजी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्याने कांदा उत्पादक शेतक-यांवर उदरनिर्वाहाचे संकट कोसळले आहे. जो कांदा लावलेला आहे त्या कांद्याचे काय करावे, असा प्रश्‍न शेतक-यांना पडला आहे. निर्यात बंद केल्याने कांद्याचे भाव पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादनावर परिणाम होणार आहे. परिणामी, कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेवून कांदा उत्पादकावरील अन्याय थांबविण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे करण्यात आला आहे. यावेळी निवेदन देताना शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, नगरसेवक प्रा. डॉ. बबलू देशमुख, नगरसेविका वैशाली सवाई, सिकंदर शहा, बंडू जाधव, मोहसिन खान, कौस्तुभ शिर्के, अरुण ठाकूर, जितेश नावडे, घनश्‍याम अत्रे, अजय किन्हीकर, नगरसेविका पल्लवी रामटेके, अफजर अली, दत्ता जयस्वाल, राजू गवळी, अभिलाष मुळे, दिपक ठेंगरे, ओम फुटाणे, गजानन बानेवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

संपादक- जितेश नावडे –  85309 67128

सहयोगी संपादक- सतीश बाळबुधे- 9503565754

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here