Home Breaking News जिल्ह्यात 1163 जण पॉझेटिव्ह ; 1011 कोरोनामुक्त , जिल्ह्याबाहेरील चार मृत्युसह...

जिल्ह्यात 1163 जण पॉझेटिव्ह ; 1011 कोरोनामुक्त , जिल्ह्याबाहेरील चार मृत्युसह एकूण 20 मृत्यु

179
0

यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात गत 24 तासात 1163 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 1011 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 20 मृत्यु झाले. यातील 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, पाच मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. शनिवारी झालेल्या एकूण 20 मृत्युपैकी चार मृत्यु जिल्ह्याबाहेरील आहे.
जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 6042 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1163 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4879 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5972 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2858 तर गृह विलगीकरणात 3114 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 46704 झाली आहे. 24 तासात 1011 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 39659 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1073 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.27 असून मृत्युदर 2.30 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 66, 70, 49 वर्षीय पुरुष आणि 80, 83 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 80 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 68 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 85 वर्षीय पुरुष, हिंगणघाट (जि. वर्धा) येथील 60 वर्षीय पुरुष, माहूर (जि. नांदेड) येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये पांढरकवडा येथील 30, 60 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, दारव्हा येथील 75 वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील 85 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 49 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 52 वर्षीय पुरुष, नांदेड येथील 62 वर्षीय महिला आणि नागपूर येथील 46 वर्षीय पुरुष आहे.
शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1163 जणांमध्ये 653 पुरुष आणि 510 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 371 पॉझेटिव्ह रुग्ण, दिग्रस 163, वणी 147, उमरखेड 90, पांढरकवडा 67, झरी 49, दारव्हा 45, घाटंजी 45, मारेगाव 40, बाभुळगाव 36, महागाव 23, नेर 22, आर्णि 20, कळंब 16, पुसद 12, राळेगाव 8 आणि इतर शहरातील 9 रुग्ण आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 380774 नमुने पाठविले असून यापैकी 376277 प्राप्त तर 4497 अप्राप्त आहेत. तसेच 329573 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 577 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 0 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 240 बेडपैकी 181 रुग्णांसाठी उपयोगात, 59 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 33 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2573 बेडपैकी 1445 उपयोगात, 1128 शिल्लक आणि 23 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 795 बेडपैकी 619 उपयोगात तर 176 बेड शिल्लक आहेत.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here