Home Breaking News जिल्ह्यात 1105 जण पॉझेटिव्ह ; 810 कोरोनामुक्त, जिल्ह्याबाहेरील तीन मृत्युसह एकूण...

जिल्ह्यात 1105 जण पॉझेटिव्ह ; 810 कोरोनामुक्त, जिल्ह्याबाहेरील तीन मृत्युसह एकूण 39 मृत्यु

118
0

यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात गत 24 तासात 1105 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 810 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 39 मृत्यु झाले. यातील 27 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तीन मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर नऊ मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. रविवारी झालेल्या एकूण 39 मृत्युपैकी तीन मृत्यु जिल्ह्याबाहेरील आहे.
जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 5774 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1105 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4669 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6228 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2790 तर गृह विलगीकरणात 3438 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 47809 झाली आहे. 24 तासात 810 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 40469 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1112 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.36 असून मृत्युदर 2.33 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 26, 75, 40, 55, 67, 20, 30 वर्षीय पुरुष आणि 56, 42, 75, वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 37, 45, 57 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 36, 52 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 39, 64 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 65 वर्षीय महिला, तालुक्यातील 78 वर्षीय महिला, वणी येथील 40, 60, 61 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, पांढकरवडा तालुक्यातील 48 वर्षीय महिला, नागपूर येथील 45 वर्षीय पुरुष, माहूर येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये पुसद येथील 55 वर्षीय महिला, दारव्हा येथील 74, 75 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 58, 60 वर्षीय पुरुष, वणी येथील 80 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 72 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 57 वर्षीय पुरुष, पुसद येथील 65, 55, 72 वर्षीय पुरुष आणि वाशिम येथील 50 वर्षीय पुरुष आहे.
रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1105 जणांमध्ये 582 पुरुष आणि 523 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 321 पॉझेटिव्ह रुग्ण, पांढरकवडा 142, पुसद 117, घाटंजी 86, वणी 75, उमरखेड 73, दिग्रस 55, कळंब 49, नेर 42, आर्णि 38, झरी 25, मारेगाव 22, महागाव 21, बाभुळगाव 19, राळेगाव 5, दारव्हा 5, आणि इतर शहरातील 10 रुग्ण आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 386901 नमुने पाठविले असून यापैकी 382053 प्राप्त तर 4848 अप्राप्त आहेत. तसेच 334244 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 577 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 0 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 240 बेडपैकी 186 रुग्णांसाठी उपयोगात, 54 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 33 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2573 बेडपैकी 1361 उपयोगात, 1212 शिल्लक आणि 24 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 805 बेडपैकी 624 उपयोगात तर 181 बेड शिल्लक आहेत.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here