Home Breaking News मावळणी ग्रामपंचायती कडून कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त.

मावळणी ग्रामपंचायती कडून कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त.

30
0

यवतमाळ : गावच नव्हे तर संपूर्ण भारतात कोरोना या आजाराने कहर केलेला आहे..शहरी भाग तर सोडाच ,ग्रामीण भागात सुद्धा मोठया प्रमाणात रुग्ण निघत आहे..मावळणी ग्रामपंचायती ने पुढाकार घेत गावा मध्ये रुग्ण निघू नये या करिता गावात जण जागृती करत आहे..कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय मंहून 3 गावाचा समावेश असणाऱ्या मैतापूर,सोनखास व मावळणी गावात फवारणी करण्यात आली असून ग्रामपंचायत मावळणी तर्फे गावात सॅनिटायझर चा वाटप करण्यात आला तर श्रम साफल्य संथा घाटंजी चे अध्यक्ष अमित पडलवार व कळंब येथील राजुभाऊ सारडे यांच्या कडून मास्क चा वाटप करण्यात आला…कोरोनाने गावात दस्तक देऊ नये मंहून गावातील ग्राम समिती सर्वोतोपरी काम करत आहे…यासाठी गावच्या सरपंच दिपाली जामुनकर, उपसरपंच मनीषा काटे, सचिव खसाळे सर, तलाठी तिराळे सर, कृषी सहाय्यक चंदनशिवे सर, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल डोंगे, सुधाकर कांबळे, शिला भोयर, प्रफुल कोठारी, शेवंतां मडावी, आशा साधना भगत, पोलीस पाटील बुरबुरे, अंगणवाडी सेविका दुमने, मैतापूर पोलीस पाटील राजू मडावी, राणी माने, ग्रामपंचायत कर्मचारी हरी भोंडे..इत्यादी लोक परिश्रम घेत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here