Home Breaking News सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा कोरोना पॉज़िटिव पेक्षा वाढीवर …

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा कोरोना पॉज़िटिव पेक्षा वाढीवर …

148
0

यवतमाळ, दि. 2 : जिल्ह्यात सलग दुस-या दिवशीही कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 768 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 994 जण कोरोनामुक्त झाले. तसेच एकूण 25 मृत्यु झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 17, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये सहा आणि खाजगी रुग्णालयात दोन मृत्यु झाले. तसेच एकूण मृत्युपैकी दोन मृत्यु नांदेड आणि अमरावती जिल्ह्यातील आहे.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 4727 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 768 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3959 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6491 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2498 तर गृह विलगीकरणात 3993 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 54760 झाली आहे. 24 तासात 994 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 46943 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1326 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.75असून मृत्युदर 2.42 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 37, 65 वर्षीय पुरुष आणि 59, 63 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 64, 66 वर्षीय पुरुष, वणी येथील 81, 43, 45 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 30 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 67 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 59 वर्षीय महिला, दिग्रस येथील 35 वर्षीय महिला, माहूर येथील 70 वर्षीय पुरुष आणि धामणगाव येथील 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यामध्ये वणी येथील 60 वर्षीय महिला, तालुक्यातील 77 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 63 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 45 वर्षीय पुरुष व 80 वर्षीय महिला आणि राळेगाव येथील 55 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात वणी येथील 50 वर्षीय पुरुष आणि पुसद येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 768 जणांमध्ये 479 पुरुष आणि 289 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 142 पॉझेटिव्ह रुग्ण, घाटंजी 118, उमरखेड 107, पांढरकवडा 72, वणी 63, मारेगाव 56, कळंब 43, महागाव 34, दारव्हा 30, पुसद 26, नेर 25, झरी 20, बाभुळगाव 15, राळेगाव 6, दिग्रस 5, आर्णि 3 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 429471 नमुने पाठविले असून यापैकी 422133 प्राप्त तर 7338अप्राप्त आहेत. तसेच 367373 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here