Home Breaking News उमरी येथील युवकांचा रुग्णांचा नातेवाईकांना एक मदतीचा हात !

उमरी येथील युवकांचा रुग्णांचा नातेवाईकांना एक मदतीचा हात !

33
0

यवतमाळ : संपूर्ण जगात कोरोना या मारीने हाहाकार माजविला असून अनेकांना मृत्यूच्या दाढेत ढकलले. अशा आपत्तीजनक परिस्थितीत माणुसकीचा परिचय देत उमरी (रोड) जि. यवतमाळ येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते आशिष पंडित शुक्ला निलेश वाभीडकर तथा मित्रपरिवार यांचे वतीने आज दि. 5 मे 2021 रोजी स्थानिक क्रिश्चन हॉस्पिटल येथील कोविड सेंटर तसेच इतर रुग्ण व नातेवाईकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता हळद व ड्रायफूट मिश्रित दूध तसेच सकाळच्या नाश्त्याची उपलब्धता करून देण्यात आली. आणि कोरोना संकट काळ संपेपर्यंत ही सेवा अविरत सुरू राहील असे स्पष्ट मत निलेश वाभीटकर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here