Home Breaking News 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 351 ने जास्त!

24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 351 ने जास्त!

178
0

यवतमाळ, दि. 11 : जिल्ह्यात सलग दुस-या दिवशीही कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जास्त असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. सोमवारी बरे होणा-यांचे प्रमाण 195 ने जास्त होते. तर मंगळवारी कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे 351 ने जास्त आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 776 जण पॉझेटिव्ह आले असून 1127 जण कोरोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्याबाहेरील दोन मृत्युसह जिल्ह्यात एकूण 25 मृत्युची नोंद झाली. यातील वैद्यकीय महाविद्यालयात 14, खाजगी कोव्हीड रुग्णालयात 10 आणि डीसीएचसीमध्ये एक मृत्यु झाला.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 6936 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 776 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6160 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6712 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2500 तर गृह विलगीकरणात 4212 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 64428 झाली आहे. 24 तासात 1127 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 56174 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1542 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.10, मृत्युदर 2.39 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 49 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 70, 45, 45 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 65, 45 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 51 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 50 वर्षीय महिला, नेर येथील 67 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 29 वर्षीय महिला, वणी येथील 73 वर्षीय पुरुष, झरीजामणी तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, जिल्ह्याबाहेरील धामणगाव येथील 58 वर्षीय पुरुष आणि चंद्रपूर येथील एक पुरुष आहे.
जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यामध्ये दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये आर्णि येथील 50 वर्षीय महिला, यवतमाळ येथील 35, 75, 47 वर्षीय पुरुष व 61, 66 वर्षीय महिला, वणी येथील 52 वर्षीय महिला, पुसद येथील 55, 75 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 53 वर्षीय पुरुष समावेश आहे.
मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 776 जणांमध्ये 466 पुरुष आणि 310 महिला आहेत. यात वणी येथील 118 पॉझेटिव्ह रुग्ण, यवतमाळ 89, पांढरकवडा 86, पुसद 72, घाटंजी 58, दिग्रस 52, झरीजामणी 50, बाभुळगाव 43, दारव्हा 42, नेर 32, आर्णि 32, राळेगाव 30, मारेगाव 25, उमरखेड 24, कळंब 8, महागाव 3 आणि इतर शहरातील 12 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 491782 नमुने पाठविले असून यापैकी 489598 प्राप्त तर 2184 अप्राप्त आहेत. तसेच 425170 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 798 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सात डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 30 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 798 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 395 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 182 बेड शिल्लक, सात डीसीएचसीमध्ये एकूण 386 बेडपैकी 157 रुग्णांसाठी उपयोगात, 229 बेड शिल्लक आणि 30 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1099 बेडपैकी 712 उपयोगात तर 387 बेड शिल्लक आहेत. तर जिल्ह्यातील 38 सीसीसीमध्ये एकूण 2963 बेडपैकी 1313 उपयोगात आणि 1650 बेड शिल्लक आहेत.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here