Home Breaking News फुबगाव ते उदापुर रस्त्याची झाली दुरावस्था, रस्ता लवकर बनवावा ही म.न.से.ची मागणी.

फुबगाव ते उदापुर रस्त्याची झाली दुरावस्था, रस्ता लवकर बनवावा ही म.न.से.ची मागणी.

143
0

यवतमाळ : सध्या सोशल मीडियाचा वापर खूप वाढला आहे, याचाच फायदा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेर तालुका अध्यक्ष प्रणिल जाधव यांनी लोकांना उदापुर ते फुबगाव रस्त्याची झालेली अत्यंत वाईट परीस्थिती व्हिडिओ च्या माध्यमातून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला, उदापुर हे नेर तालुक्यात येत असून हे नेर तालुक्याचा शेवटचा गाव आहे आणि फुबगाव हे दारव्हा तालुक्यातील गाव आहे, या रस्त्याची समस्या म्हणजे हा अर्धा रस्ता नेर तालुक्यात असून अर्धा दारव्हा तालुक्यात आहे,म्हणून या रस्त्यावर कोणाचच लक्ष जात नसल्याचं त्यांनी सांगितलं, मागील कित्तिक वर्षांपासून तो रस्ता बनला नाही आहे त्यामुळे रस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती झाली, सध्या गावपातळी वरील रस्ता हे ठेकेदार चांगल्या पद्धतीने न बांधता त्या मध्ये भ्रष्टाचार करतो,हे सर्व आपल्याच चुकी मुळे होतात,रस्ता बनत आहे तर त्या मागची प्रक्रिया आपल्याला योग्य रित्या समजून घेऊन त्याच पद्धतीने तो रस्ता ठेकेदार कडून बनवून घेतला पाहिजे असे आव्हान देखील त्यांनी केले, जर रस्ता बनते वेळी गावकऱ्यांनी त्याची दखल नाही घेतली तर ठेकेदाराला अस वाटते की हा रस्ताची कोणीच दखल घेत नाही आहे त्यांना अस वाटते की या रस्त्याची गरज कोणालाच नाही,म्हणून तो ठेकेदार भ्रष्टाचार करतो असे आरोप देखील त्यांनि केले आहे, उदापुर ते फुबगाव हा रस्ता मौत का कुवा सारखे झाले जशी कसरत मौत का कुंवा मध्ये केली जाते तशीच कसरत त्या रस्त्यावर नागरिकांना करण्याची वेळ आली आहे, रस्त्यावर असंख्य असे खड्डे निर्माण झाले असून पावसाळ्यात ते खड्डे पूर्ण पाण्याने भरून जातात त्यामुळे खूप वेळा तिथे अपघात देखील होतात, सध्या कोरोनाचा काळ सुरू असतांना पेशंटला जर जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायचे असेल तर त्यांना उशिरा पोहचावे लागतात, काही विद्यार्थी नेर येथे शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना योग्य वेळी शाळा कॉलेजमध्ये उपस्थित होऊ शकत नाही, गावकऱ्यांनी अनेक संकटाच्या सामोरे जावे लागत आहे, म्हणून सरकार ने तो रस्ता लवकरात लवकर बनवला पाहिजे अशी मागणी सुद्धा प्रणिल जाधव जाधव यांनी केली.
या वेळी म.न.वि.से.नेर तालुका अध्यक्ष प्रणिल जाधव,पंकज राठोड , यश बांबल, गोकुळ चव्हाण, प्रतीक चव्हाण,रोहित पवार, सुरज राठोड हे आदी गावातील तरुण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here