Home Breaking News खासदार राजीव सातव यांची अल्पशा आजाराने प्राणज्योत मावळली!

खासदार राजीव सातव यांची अल्पशा आजाराने प्राणज्योत मावळली!

69
0

पुणे दि.१६ मे -:काँग्रेसचे तरुण तडफदार नेते राजीव सातव यांना कोरोनाची बाधा झाली होती आज सकाळीच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.गेल्या २३ दिवसांपासून ते पुण्यातील रुग्णालयात व्हेंटीलेटरवर होते.राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.ते हिंगोली लोकसभा मतदार संघाचे ते खासदार होते.२०१४ साली संपूर्ण देशात मोदी लाट असतानाही राजीव सावत हिंगोलीमधुन निवडून आले होते.राजीव सातव यांच्याकडे काँग्रेसने गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे.त्यांना चार वेळा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
१९ एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली होती.२२ तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.२३ एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल झाले.२५ तारखेला त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तर काही तक्रारींमुळे २८ तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.आज त्यांची प्राणज्योत मिळवल्याने काँग्रेस पक्षाची मोठी हाणी झाल्याचे बोलल्या जात आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशात मोदी लाट असतांना महाराष्ट्रातुन एकमेव खासदार म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघातून निवडुन आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here