Home Breaking News 24 तासात 518 जण पॉझेटिव्ह, 760 बरे….

24 तासात 518 जण पॉझेटिव्ह, 760 बरे….

178
0

यवतमाळ, दि. 17 : जिल्ह्यात गत 24 तासात 518 जण पॉझेटिव्ह तर 760 जण कोरोनामुक्त झाले असून 15 जणांचा मृत्यु झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 11 मृत्यु तर खाजगी रुग्णालयातील चार मृत्यु आहे. तसेच 15 मृत्युमध्ये जिल्ह्याबाहेरील अमरावती व वाशिम जिल्ह्यातील दोन मृत्यु आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 6220 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 518 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5702 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4448 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2127 तर गृह विलगीकरणात 2321 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 68221 झाली आहे. 24 तासात 760 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 62138 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1635 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.68 , मृत्युदर 2.40 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 58, 65 वर्षीय पुरुष तालुक्यातील 45, 60 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 57 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 70 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 65 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 65 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्याबाहेरील अमरावती येथील 75 वर्षीय महिला आणि वाशिम येथील 37 वर्षीय पुरुष आहे. खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 59 वर्षीय महिला, दिग्रस येथील 45, 61 वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.
सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 518 जणांमध्ये 303 पुरुष आणि 215 महिला आहेत. यात दारव्हा येथील 125 रुग्ण पॉझेटिव्ह, वणी 116, आर्णि 58, यवतमाळ 45, पांढरकवडा 31, मारेगाव 27, पुसद 25, दिग्रस 19, बाभुळगाव 18, कळंब 17, राळेगाव 11, महागाव 10, घाटंजी 5, नेर 5, उमरखेड 4 आणि इतर शहरातील 2 रुग्ण आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 538168 नमुने पाठविले असून यापैकी 535399 प्राप्त तर 2769 अप्राप्त आहेत. तसेच 467178 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1161 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 32 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 1161 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 334 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 243 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 162 रुग्णांसाठी उपयोगात, 364 बेड शिल्लक आणि 32 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1141 बेडपैकी 587 उपयोगात तर 554 बेड शिल्लक आहेत.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here