Home Breaking News श्री गजानन महाराज ट्रस्ट, गणेश नगर यवतमाळ च्या वतीने 2 लाख 21...

श्री गजानन महाराज ट्रस्ट, गणेश नगर यवतमाळ च्या वतीने 2 लाख 21 हजार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास सुपूर्त…

20
0

यवतमाळ दि 21 मे: कोरोनाच्या वैश्विक महामारीत एकीकडे संबंध जग होरपळून निघतांना प्रचंड आर्थिक संकट उभे झालेले असतांना यवतमाळ येथील वडगाव परिसरातील गणेश नगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिर च्या वतीने यवतमाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास 2 लाख 21 हजार रुपये जिल्हा प्रशासनास प्रदान करण्यात आलेत, यावेळी वरील रकमेचा चेक मा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना प्रदान करण्यात आला, यावेळी संस्थान चे अध्यक्ष आत्मारामजी चौके, सचिव दादाराव शंभरकर, नगरसेवक दिनेश गोगरकर प्राधान्याने उपस्थित होते, श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थान ने दिलेल्या मदतीच्या हातामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे, या पूर्वी देखील जेव्हा जेव्हा देशावर संकटे आली वा सामाजिक कार्यासाठी श्री संत गजानन महाराज संस्थानने प्राधान्याने मदतीचा हात दिला हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here