Home Breaking News आज जिल्ह्यात 161 पॉझेटिव्ह, 275 कोरोनामुक्त, 8 मृत्यु..

आज जिल्ह्यात 161 पॉझेटिव्ह, 275 कोरोनामुक्त, 8 मृत्यु..

146
0

यवतमाळ, दि. 26 : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त आहे. जिल्ह्यात 112 जण पॉझेटिव्ह तर 275 जण कोरोनामुक्त झाले असून आठ जणांचा मृत्यु झाला. यातील पाच मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर तीन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 5959 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 161 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5798 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2414 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1019 तर गृह विलगीकरणात 1319 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71282 झाली आहे. 24 तासात 275 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 67131 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1741 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.91, मृत्युदर 2.44 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये कळंब तालुक्यातील 75 वर्षीय महिला, राळेगाव तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, बाभुळगाव येथील 61 वर्षीय महिला, घाटंजी तालुक्यातील 67 वर्षीय पुरुष आणि नेर 65 महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात मारेगाव तालुक्यातील 56 वर्षीय महिला, उमरखेड येथील 65 वर्षीय पुरुष, झरी जामणी येथील 45 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.
मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 161 जणांमध्ये 90 पुरुष आणि 71 महिला आहेत. यात आर्णी येथील 9, बाभुळगाव येथील 5, दारव्हा येथील 4, दिग्रस येथील 12, घाटंजी येथील 5, कळंब येथील 0, महागाव येथील 4, मारेगाव येथील 1 नेर येथील 12 पांढरकवडा 24, पुसद येथील 17, राळेगाव 6, उमरखेड 2, वणी येथील 31, यवतमाळ 23, झरीजामणी 1 आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1700 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 579 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1700 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 166 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 411 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 136 रुग्णांसाठी उपयोगात, 390 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 277 उपयोगात तर 899 बेड शिल्लक आहेत.
०००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here