Home Breaking News मोदींचे सात वर्षे : ऐतिहासिक अपयश : जिल्हा काँग्रेस कमिटी..

मोदींचे सात वर्षे : ऐतिहासिक अपयश : जिल्हा काँग्रेस कमिटी..

133
0

यवतमाळ :  रविवार दिनांक 30 मे, 2021 रोजी केंद्रातील मोदी शासनास 7 वर्ष पूर्ण होत आहे, मोदी सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे, देशाची ढासळती अर्थव्यवस्था, कोरोना साथ रोगामध्ये नियोजनातील गाफीलपणा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात अपयश, लसीकरण मोहिमेत आलेले अपयश, दररोज डिझेल पेट्रोल ची दरवाढ व महागाई, नोट बंदी व जीएसटी सारखे अपयशी निर्णय, देशातील वाढती बेरोजगारी, शेतकाऱ्यांविरोधात काळे कायदे,
आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नामुष्की, मोदींच्या दोन उद्योगपती मित्रांसाठी देश विकायला काढला, रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, पेट्रोलियम कंपन्या, बँका अश्या सरकारी आस्थापना विकायला काढल्या ज्या जनतेची संपत्ती आहे.
इत्यादी पातळीवर केंद्रातील मोदी सरकार अपयशी झाले आहे.
अश्या अपयशी मोदी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा व अश्या अपयशी केंद्र शासनाचा यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने यवतमाळ येथील एल आय सी चौकात आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला या वेळी माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, खा बाळासाहेब धानोरकर, आ डॉ वजाहत मिर्झा, वामनराव कासावार, बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, अशोकराव बोबडे, टिकाराम कोंगरे, मनीष पाटील, जावेद अन्सारी, दिनेश गोगरकर, अनिल गायकवाड, संजय मोघे, जाफर खान, रमेश महानूर, श्रीकांत देशमुख, राजा चव्हाण, वैशाली सवाई, प्रदीप डंभारे, जितेश नावडे, दिनेश सुकोळे, आरिफ खान, हुसेन खान, शुभम लांडगे, राजू गिरी,ओम फुटाणे,  अशोकराव उमरतकर आदी मान्यवर उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here