Home Breaking News 24 तासात कोरोनाबधितांपेक्षा कोरोनामुक्त दुप्पट. आज एकही मृत्यू नाही……

24 तासात कोरोनाबधितांपेक्षा कोरोनामुक्त दुप्पट. आज एकही मृत्यू नाही……

172
0

यवतमाळ, दि. 2 जून : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात 24 तासात बरे झालेल्या रुग्णांची कोविड बाधितांपेक्षा दुप्पट आहे. आज 267 जण कोरोनामुक्त झाले असून 101 जण पॉझेटिव्ह आले असून विशेष म्हणजे आज कुणाचाही मृत्यु झालेला नाही. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी  एकूण 4897 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 101 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4796 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1086 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 536 तर गृह विलगीकरणात 550 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72098 झाली आहे. 24 तासात 267 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 69244 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1768 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 31 हजार 123 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 57 हजार 730 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.42 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी  दर 2.06 आहे  तर मृत्युदर 2.45 आहे.            
 
      पॉझेटिव्ह आलेल्या 101 जणांमध्ये 68 पुरुष आणि 33 महिला आहेत. यात आर्णी येथील 5, बाभुळगाव येथील 2, दारव्हा येथील 11, दिग्रस येथील 10 , घाटंजी 2, कळंब 2,   महागाव येथील 5, मारेगाव येथील 1, नेर येथील 3, पांढरकवडा 4, पुसद येथील 11, राळेगाव 0, उमरखेड 5,   वणी येथील 1, यवतमाळ 28, झरीजामणी 9 आणि इतर शहरातील 2 रुग्ण आहे.  
            जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1936 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 343 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1936 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 107 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 470 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 100 रुग्णांसाठी उपयोगात तर  426 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 136 उपयोगात तर 1040 बेड शिल्लक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here