Home Breaking News नानाभाऊ पटोलेंच्या वाढदिवसाला काॅग्रेसतर्फे विविध सामाजिक उपक्रम..

नानाभाऊ पटोलेंच्या वाढदिवसाला काॅग्रेसतर्फे विविध सामाजिक उपक्रम..

62
0

गरजू शेतकरी, सलुन व्यावसायिकांना मदतीचा हात.

ऑक्सीजन काॅन्संट्रेटरसह आवश्यक सामग्रीचे वाटप, अंत्यसंस्कार करणा-या कोरोना योद्ध्यांचा सत्कार.

यवतमाळ: देशात कोरोनामुळे कठीण परिस्थिती निर्माण झालेली असतांना वाढदिवस गरजूंची मदत करून साजरा करावा असे आवाहन काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत किसान काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार व नगरसेवक जावेद अन्सारी यांच्या पुढाकाराने यवतमाळ येथे काॅग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते. कोरोनामुळे ज्या शेतकरी परिवारात कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटूंबाला पेरणीसाठी बियाणे वितरित करण्यात आले. तसेच लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या गरजू सलुन व्यावसायिकांना धान्यवाटप करण्यात आले.

ज्या कोविड सेंटर मध्ये ऑक्सीजनची गरज आहे तिथे 16 ऑक्सीजन काॅन्संट्रेटर या निमित्ताने देण्यात आले.
कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याचे अतुल्य कार्य ज्यांनी केले त्या 23 कोरोना योद्ध्यांचा या छोटेखानी कार्यक्रमात प्रत्येकी 7 हजार रूपये सन्मान राशी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्व.वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या कोरोना रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक सामग्रीचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री माणिकराव ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची उपस्थिती होती. यावेळी काॅग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष आ.डाॅ.वजाहत मिर्झा, माजी मंत्री वसंतराव पुरके, बाळासाहेब मांगुळकर, प्रविण देशमुख, अशोकराव बोबडे, राहूल ठाकरे, अरूण राऊत, जावेद भाई, प्रदीप डभारे , चंदू चौधरी, दिनेश गोगटकर, बबलू देशमुख, छोटू पावडे, विजय मोघे, वैशाली सवई, किरण कुमरे, अशोक भुतडा, दर्शना इंगोले, जितेश नावडे, ओम फुटाणे, छोटू सवई, अरविंद वाढोणकर, ललित जैन, पल्लवी रामटेके, जाफर खान, साहेबराव पवार, राजेंद्र हेंडवे, मिनाक्षी सावळकर, मिलिंद रामटेके यांची उपस्थिती होती.

कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून अत्यंत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंतकुमार आडे, प्रा.विठ्ठल आडे, सै.रफिक बाबू, संजय डंभारे, अरूण नक्षणे, संजय नक्षणे, मारोतराव जाधव, पंजाबराव घोडसरे, वासुदेव राठोड, सुधीर सोनटक्के, लालसिंग अजमेरकर यांच्यासह यवतमाळ जिल्हा काॅग्रेस व किसान काॅग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here