Home Breaking News राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापनदीन 22 ग्रामपंचायत ला मास्क ,सॅनिटायझर देऊन...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापनदीन 22 ग्रामपंचायत ला मास्क ,सॅनिटायझर देऊन साजरा…

34
0

राष्ट्रवादी युवती काँग्रेस चा उपक्रम..

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापन दिन 10 जून ला साजरा करण्यात आला, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.ना.जयंत पाटील साहेब यांनी वर्धापनदिन हा आरोग्य सप्ताह म्हणुन साजरा करावा असे आव्हान करण्यात आले..त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माजी आमदार संदीपभाऊ बाजोरिया व राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या प्रदेशाध्यकशा सक्षणा ताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील पार्डी (सावळापूर) ग्रामपंचायतिला मास्क व सॅनिटायझर वाटप करत आज पासून सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मनीषाताई काटे(भोसले),पार्डी (सावळापूर) ग्रामपंचायत सरपंच अमित पिसे , उपसरपंच प्रशांत साहत्रकार, ग्रामपंचायत सदस्य श्री. गजानन टेकाम, सौ. प्रितीताई कांबळे, सौ.अर्चनाताई भोयर, रोजगार सेवक श्री. प्रमोद पाटील गावातील नागरिक श्री. निखिल अंबुलकर, सौ. शारदाबाई पिसे, पंकज दरणे तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोज पिसे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here