Home Breaking News प्रभाग क्र १७ मधील गढूळ पाण्याचा पुरवठा भाजपा महिला आघाडीच्या सौ.मिनल पांडे...

प्रभाग क्र १७ मधील गढूळ पाण्याचा पुरवठा भाजपा महिला आघाडीच्या सौ.मिनल पांडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर..

108
0

यवतमाळ:  शहरातील प्रभाग क्र १७ मधील नागरिकांना जीवन प्राधिकरण कडून दरवर्षी पावसाळ्यात गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. यंदाही तीच परंपरा कायम ठेवली असून शहरात होणाऱ्या गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यवतमाळ शहरात होणारा पाणीपुरवठा सुरुवातीचे दोन ते तीन दिवस कमी दाबाने आणि गढूळ होत होता. आता पिण्याचे पाणी आता १५ दिवसांनी येत असले तरीही प्रभाग क्र १७ मधील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.

प्रभाग क्र १७ मधील शिवाजी नगर, बब्बी पहेलवान चौक, टिळकवाडी, वीर वामनराव चौक या परिसरातील नागरिकांना महिनाभरापासून अनियमित व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे जादा पैसे खर्च करून पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत आहेत. यामुळे येथील परिसरातील संतप्त महिलांनी गढूळ पाण्याच्या बाटल्या घेऊन अधिकाऱ्यांना
देण्यासाठी जीवन प्राधिकरण गाठले आहे. जीवन प्राधिकरणाची जलशुद्धीकरण यंत्रणा सक्षम नसल्याचा जाब विचारावा लागला. पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला असून आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे महिलांनी गढूळ पाण्याबाबतचा जाब विचारण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या दारात ठिय्या दिला. त्यानंतर गढूळ पाण्याच्या बाटल्या अधिकाऱ्यांना दाखवून हे पाणी पिण्यायोग्य आहे का,असा प्रश्न उपस्थित करून पाण्याबाबतच्या समस्यांचे निवेदन दिले. तसेच नळाचे पाणी रात्री कधीही सोडत असल्याने नागरिकांची दमछाक होते. झोपण्याच्या वेळी पाण्यासाठी जागे राहावे लागत आहे. त्यातच जागे राहून पदरात पडते ते गढूळ पाणी. त्यामुळे सर्व नागरिकांना शुद्ध पाणी पुरविण्यात यावे, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या सौ‌.मिनल पांडे यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here