Home Breaking News वर्धापन दिनानिमित्य शिवसैनिकांची शिवसेनच्या भगव्या ध्वजाला मानवंदना..

वर्धापन दिनानिमित्य शिवसैनिकांची शिवसेनच्या भगव्या ध्वजाला मानवंदना..

20
0

विविध महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

यवतमाळ :आज शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दीना निमित्य शिवसेना संपर्क कार्यालयात आमदार संजय राठोड यांचे प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या भगव्या ध्वजाला मानवंदना देण्यात आली.ह्या प्रसंगी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेला आमदार संजय राठोड,सौ कांचनताई चौधरी,जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,महिला आघाडी जिल्हा संघटिका लता चंदेल,जिल्हा संघटिका निर्मला विनकरे,शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना प्रबोधनकार ठाकरे यांचे निर्देशानुसार हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती.हीच शिवसेना आज 55 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद यशस्वी रित्या सांभाळत आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वात महाराष्ट्राने कोरोनाचे संकट थोपवून धरले आणि आज महाराष्ट्र ह्या सर्व संकटातून सावरून पुन्हा यशस्वी मार्गक्रमण करीत आहे असे ह्या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी सांगितले.ह्या प्रसंगी दामिनीताई संजय राठोड,नगर सेवक गजानन इंगोले,उपतालुका प्रमुख डॉ अनिल नाईक,अरुण वाकळे,शिवसेना बोरी शहर प्रमुख रवी जाधव,राहुल लहाडके,उद्धव साबळे,सौ संगीता राऊत,वैशाली किनाके,रवी राऊत,अशोक पुरी,गार्गीताई गिरडकर,राजेंद्र कोहरे,गिरीश व्यास,अमोल धोपेकर,कमलकिशोर मिश्रा,दशरथ शेजुळकर,कृष्णराव इरवे,उमेश पुडके,पद्माकर काळे,प्रभाकर बहादूरे,राजू राऊत,श्याम थोरात,सतीश सकट, सचिन बारसकर,अनिकेत हिवरकर,फिरोज पठाण,नंदकिशोर गुल्ह्याने,प्रसाद अवसरे,शोएब शाह,अर्पित पाटील,चेतक क्षीरसाठ,रुपेश सरडे,गौरव चौधरी,गणेश साबळे, तुषार देशमुख,राहुल गंभीरे,ज्योती चिखलकर,स्मिताताई दुर्गे व शिवसैनिक व महिला आघाडी रणरागिणी उपस्थित होत्या.

यवतमाळ शहरातील विविध महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
आज शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री आमदार संजय राठोड यांचे प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत सामाजिक कार्यकर्त्या सौ सोनाली अहेर व त्यांचे सहकारी महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.ह्या प्रसंगी सौ सोनाली अहेर यांचे सोबत वनिता सवाईकर,भारती सवाईकर,सौ वैशाली वऱ्हाडे, सौ माधवी देशपांडे,अर्चना सुके, दीपाली राऊत,स्वाती सुके,रजनी राऊत,कल्पना लांडगे इत्यादी महिलांनी प्रवेश केला.तसेच युवा कार्यकर्ते निखिल सवाईकर,आशिष बाविस्कर,प्रतीक सवाईकर,दिनेश वाघाए, प्रवीण वऱ्हाडे ह्यांनी सुद्धा शिवसेनेचा भगवा शेला परिधान करून शिवसेनेत प्रवेश केला.ह्या प्रवेश कार्यक्रमाला सौ कांचनताई चौधरी,
जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,श्रीधर मोहोड,महिला आघाडी जिल्हा संघटिका लता चंदेल,महिला आघाडी जिल्हा संघटिका निर्मलाताई विनकरे ह्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here