Home Breaking News खा.राहुल गांधी च्या वाढदिवशी काँग्रेस ने संकल्प दिवस’ केला साजरा, पेट्रोल दिले...

खा.राहुल गांधी च्या वाढदिवशी काँग्रेस ने संकल्प दिवस’ केला साजरा, पेट्रोल दिले 65 रुपये दराने….

89
0

यवतमाळ : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस कमिटीने संकल्प दिवस म्हणून साजरा केला.
2014 मध्ये कॉंग्रेसच्या कारकिर्दीत पेट्रोलची किंमत 65 रुपये होती पण आज लोकांना त्यासाठी 104 मोजावे लागत आहे.
आज यवतमाळ शहरातील प्रत्येक तीन चाकी वाहनांना दोन लिटर पेट्रोल फक्त 65 रुपयांच्या किंमतीत दिले गेले.
यवतमाळ कॉंग्रेसचे कार्यकर्ते कोणत्याही भडक उत्सवाशिवाय उदात्त कामे करत राहतात, कारण कॉंग्रेस पक्षाचे उद्दीष्ट नेहमीच लोकांची सेवा करणे हेच आहे तसेच आजच्यासारख्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत असताना लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे महागाई वाढत चालली आहे त्यातल्या त्यात ऑटो चालकांचा व्यवसाय ठप्प झाला होता आता महाग झालेल्या पेट्रोल मुळे त्यांना न
परवडणारे भाडे करावे लागत आहे म्हणून नेमकी हीच बाब हेरून यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या काळात पेट्रोलचे दर 65 रुपये होते त्याच दरात ऑटो चालकांना पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आले व उर्वरित पैसे काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले .
या संकल्प दिनाचे संयोजक जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नगरसेवक जावेद परवेज अन्सारी यांनी या प्रसंगी सांगितले की , २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 24 पट वाढ झाली आहे आणि गेल्या पन्नास दिवसांतच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रतिलिटर 6.87 रुपये आणि 7.10 रुपये वाढ करण्यात आली.
अशा प्रकारे सर्वसामान्यांवर भार टाकणे उचित नाही. इंधन दराच्या अभूतपूर्व वाढीचा अर्थव्यवस्थेवर विनाशकारी परिणाम झाला आहे, देशाची जनता अद्याप कोविड -19 च्या संकटापासून सावरली नसून आवश्यक वस्तूंच्या किंमती यापूर्वीच वाढल्या आहेत आणि येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होऊ शकेल, असे कॉंग्रेस नेते पुढे म्हणाले
पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांक गाठण्यासाठी सर्वसामान्यांना इंधन दराबाबत काळजी वाटते. इंधनाच्या किंमतींचा फटका गरीबांना बसला आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेल आतापर्यंत उच्चांकापर्यंत पोहोचले आहेत. इंधनाचे दर ग्राहकांना चिमटा काढतात म्हणून या प्रसंगी त्यांना थोडा फार का होईना दिलासा मिळावा या उदात्त हेतूने यवतमाळ शहरातील ऑटो चालकांना प्रत्येकी दोन लिटर फक्त 65 रुपये दराने पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आला.
या प्रसंगी बाळासाहेब मांगुळकर, रवी ढोक, अफसर बेग, कदिर मिर्झा चंदू चौधरी, शब्बीर खान, जितेश नवाडे, अतुल राऊत , विकी राऊत, ललित जैन ,कौस्तुभ शिर्के, आरिफ खान ,वसीम मवाल, छोटू सवाई, अहमद शहा, नईम पहलवान ,राजू गिरी, ललित जैन, सनी आगळे , ओम फुटाणे,इस्माइल खान, सय्यद हनीफ अनिस खान, युसुफ अली, फजलू भाई, इफ्तिखार अहमद, शहजाद खान,मिलिंद रामटेके, मकसूद अली, विजय बुंदेला,  सुकांत वंजारी , गुड्डू जवादे, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here