Home Breaking News आ. संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या नेत्रतपासनी शिबिरात शेकडो लोकांनी घेतला लाभ..

आ. संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या नेत्रतपासनी शिबिरात शेकडो लोकांनी घेतला लाभ..

99
0

आसेगाव देवी:-येथे कार्यसम्राट आ.माजी मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय आसेगाव देवी डॉ महात्मे आय हॉस्पिटल व जिल्हा अंधत्व समिती यांच्या संयुक्त विध्यमाणे आयोजि भव्य नेत्रतपासनी शिबिर आयोजित करण्यात आले होते. आजच्या धकााधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये यासाठी ग्रामपंचायत आसेगाव देवी यांनी आ. संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरातील उपचार नागपूर येथील डॉ महात्मे आय बँक आय हॉस्पिटलमध्ये होणार असून उपचार करणारे डॉक्टर्स अधुनिक तंत्राच्या सहायाने उपचार करणार आहे.ही सेवा रुग्णांना मोफत असून ग्रा प तर्फे सर्वाना चस्मे मोफत मिळणार आहे .या शिबिरात जेष्ठ,लहान मुले,महिलांनी लाभ घेतला या शिबिरात एकूण 250 लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये 100 रुग्णांना चस्मे, तर 40 लोकांना शस्त्रक्रिया करायला सांगण्यात आले असून 40 रुग्णांना महात्मे आय हॉस्पिटल मध्ये यावर मोफत उपचार होणार आहे.या शिबिराचे उद्घाटन येथील डॉ गीतंजली सुद्दलवार,सरपंच सचिन चव्हाण उपसरपंच निखिल वेळूकर,सदस्य भुपेंद्र लुनवत, सुभाष ताबडू, सुनीता कांबळे, ताई कोल्हे, पद्मा खोडे, ज्योती नाईक सचिव ओमप्रकाश कावलकर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीकरण्याकरिता आरोग्य विभागाचे श्री गुल्हाने ,सुवर्णा कुयटे, सविता उडाखे माला आडे,प्रवीण पूसदकर यांनी यांनी योगदान दिले.

(याचप्रमाणे दरवर्षी मा. कार्यसम्राट आमदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रतपासनी शिबिर घेण्यात येईल)
श्री सचिन चव्हाण सरपंच ग्रा. प. आसेगाव देवी ता बाभूळगाव जि यवतमाळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here