Home Breaking News अंतरराष्ट्रीय योगा दिनी “हर्बल लाइफ” तर्फे ऑनलाइन 125 सुर्य-नमस्कार काढणार्या योद्ध्यांना सन्मानपत्रचे...

अंतरराष्ट्रीय योगा दिनी “हर्बल लाइफ” तर्फे ऑनलाइन 125 सुर्य-नमस्कार काढणार्या योद्ध्यांना सन्मानपत्रचे वाटप..

119
1

यवतमाळ : आज दि.21जून अंतरराष्ट्रीय योगा दिनी हर्बल लाइफ व्दारा आयोजित ऑन लाइन योगा व १२१ सुर्य नमस्कार काढून सहभाग नोंदविणार्या योद्धांना ऑनलाइन सन्मानपत्रचे वाटप करुन त्यांचा गौरव करण्यात आले, यात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश,गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व देशातील कानाकोपर्यातून मधून हर्बल लाइफ परिवारातील शेकडो लोकांनी सहभाग घेतला होता, यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ता मोहण किसनराव जाधव यांनी सुध्दा “अंतरराष्ट्रीय योगा-दिनी” सहभाग घेवून १२१ ऐवजी १२५ सुर्य-नमस्कार काढून सन्मान पत्राचे मानकरी ठरले, त्यांनी जिल्हा वासीयांना संदेश दिले की, घरात राहुन योगा व्यायाम करा, तिसर्या लाटेच्या कोरोनावर मात करा, या साठी श्री.प्रफुलजी चौधरी यांनी वैच्छिक कोरोना महामारीच्या कालखंडा पासुन रोज सकाळी ५.३० वाजता सुरू केलेल्या ऑन लाइन योगा वर्क आउट मधे लिंक घेवून आपल्या परिवारासह सहभाग नोंदवा, मी रोज सकाळी सहभाग घेवून योगा केले त्यामुळे माझे पाच किलो वजन कमी झाले म्हणूनच १२५ सुर्य नमस्कार काढणे शक्य झाले, देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या दहशतीत आपण आपल्या घरीच योगा, व्यायाम करून तंदुरुस्त रहा व आपल्या परिवाराला सुरक्षीत ठेवा.
आम्ही गावकरी, मात करु कोरोनावरी!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here