Home Breaking News बस चालक-वाहक कर्मचाऱ्यासाठी संभाजी ब्रिगेडची विभागीय कार्यालयात धडक.

बस चालक-वाहक कर्मचाऱ्यासाठी संभाजी ब्रिगेडची विभागीय कार्यालयात धडक.

25
0

यवतमाळ: रा.प. महामंडळ यवतमाळ विभागातील विविध आगारांमध्ये माहे मार्च 2020 मध्ये चालक तथा वाहक या पदभरती पात्र झालेल्या कर्मचाऱ्यांना ड्युटीवर घेताच काही दिवसातच संपूर्ण देशात कोरोनामुळे लोक डॉन सुरू झाले सदर लोक डाऊन च्या काळात मधील इतर सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन मिळाले मात्र 2020 मधील लागलेली बॅच यांनाच कोरूना कळत कुठलेही वेतन देण्यात आले नाही मागील एक वर्षापासून त्यांची भरती झाली असली तरीही त्यांना ड्युटी सुद्धा मिळत नाही आहे व कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत त्यांना मिळाली नाही त्यामुळे कसेतरी कर्ज काढून उदरनिर्वाह त्यांचा सुरू आहे ही बाब संभाजी ब्रिगेडच्या लक्षात येताच यवतमाळ चे जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ खोब्रागडे यांना भेटून या सर्व कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली यात आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले यावर ठोस पाऊल उचलून आज संभाजी ब्रिगेडचे जिल्हाअध्यक्ष या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन विभागीय अधिकारी माननीय जोशी साहेबांकडे गेले असता त्यांची व्यथा आणि सध्याची उपासमारीची आलेली वेळ ही संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांनी त्यांच्या समोर मांडली या प्रश्नाला लवकरात लवकर सोडविण्यात यावे यासाठी संभाजी ब्रिगेडच्या आणि सर्व कर्मचारी यांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले त्यात राज्यातील इतर विभाग उदाहरणार्थ नागपूर वर्धा गडचिरोली या विभागात कामगिरिसह वेतन देण्यात आले असून यवतमाळ विभागात ही बाब शासनाच्या आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे होते याकडे स्वतः जोशी साहेबांनी लक्ष देऊन या प्रश्नावर तोडगा काढावा असे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सुरज भाऊ यांनी सांगितले त्यांच्यासोबत निहार घाडगे,अनिकेत मेश्राम, सुरज पाटील, सचिन मनवर ,अंकुश फुलझेले, सुरज फुलमाळी ,देवेंद्र उईके,निलेश्वर वरकर ,अभय झुंगरे ,आकाश जगताप, महेश बगमारे ,धर्मदास फुकरे, गोपाल राठोड ,आशिष मांजरे ,राहुल गुटखे,गणेश धोतकर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here