Home Breaking News वृत्तपत्र वितरकांना रेनकोट वाटप करून निरज वाघमारे यांनी जपली सामाजिक बांधिलकी…

वृत्तपत्र वितरकांना रेनकोट वाटप करून निरज वाघमारे यांनी जपली सामाजिक बांधिलकी…

45
0

यवतमाळ : ऊन, वारा, पाऊस तमा न बाळगता सकाळच्या सूर्योदया बरोबर घरोघरी विविध बातम्यांचा एकसंध अर्थात वृत्तपत्र पोहचविण्याचा वसा आणि वारसा प्रमाणिक पणे जोपासणाऱ्या वृत्तपत्र वितरकांचा पावसाच्या पाण्यापासून बचाव व्हावा याकरिता स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांनी आज शहरातील नेताजी नगर भागातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना व वितरकांना रेनकोटचे संचचे वाटप केले..
वृत्तपत्र वितरक हा प्रसार माध्यमातील सर्वात शेवटचा घटक असतो. अत्यल्प वेतनात काम करून आपला घर संसार चालविणाऱ्या या घटकाला हातभार मिळावा म्हणून त्यांना रेनकोट वाटप करून एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया निरज वाघमारे यांनी यावेळी दिली. यावेळी दत्ता हाडके, सचिन राऊत, प्रकाश नेरले, रवी वाघमारे, सुरज मेश्राम, जित उमरे, जहांगीर खान, सोनू वरठी, अनिरुद्ध कांबळे, महेश वाघमारे आदी तर वृत्तपत्र वितरक श्रीरामभाऊ खत्री,सुनीलभाऊ खंडारे, रवी वानखडे, रिजवान, श्रीराम कुमरे यांच्या सह अनेक वितरक उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here