Home Breaking News शिवसेना बोरी तर्फे रक्तदान,लसीकरण शिबिर व कोविड योध्यांचा सत्कार.

शिवसेना बोरी तर्फे रक्तदान,लसीकरण शिबिर व कोविड योध्यांचा सत्कार.

42
0

माजी मंत्री संजय राठोड यांचे वाढदिवसाचे निमित्य विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

यवतमाळ : शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री संजय राठोड यांचे वाढदिवसाचे निमित्य साधून यवतमाळ विधानसभेतील बोरी येथील स्वामी चंद्रशेखर महाराज देवस्थान येथे विविध सामाजिक ऊपक्रमांचे आयोजन करण्यात आले.शिवसेना बोरी चंद्रशेखर येथे उपतालुका प्रमुख डॉ अनिल नाईक व नवनियुक्त बोरी शहरप्रमुख रवी जाधव यांचे पुढाकारात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.ह्या शिबिरात बोरी येथील एकंदर पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.ह्याच कार्यक्रमात बोरी भागातील कोरोना काळात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ दिलीप जामनकर,डॉ कपिश गिरी,डॉ अनिल नाईक,डॉ सुधीर राठोड,डॉ पल्लवी डोक, डॉ मनीषा जामकर,डॉ सोनू अंभोरे,सविताताई बनकर,रजिया शेख,राहुल खडसे,गीतांजली शेंडे,ज्योती राऊत,वंदना लोणारे,नंदा काकडे,मंदा वासनिक,वसीमा पठाण,महादेव काळे,रमेश जाधव,संगीता मुंदाने,निलेश वालगुजे,हरिभाऊ ठाकरे,वीर साहेब,ढोके साहेब,रामू अवस्थी,संतोष तांगडे,जीवन बोरकर,नितीन कोल्हे ह्या मान्यवरांचा आमदार संजय राठोड यांचे हस्ते प्रशस्तीपत्रक,शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.ह्या कार्यक्रमाचे यशस्वीते करिता शहर प्रमुख रवि जाधव,उपतालुका प्रमुख डॉ. अनिल नाईक,सचिन कोरडे, मंगेश नागपूरे,रवि कदम,अनीकेत हिवरकर,गौरव पखाले, सचिन नागपूरे,अतुल धाये,चेतन कावरे,अजय रुंदे,धीरज जयस्वाल,अनिकेत तांगडे,संदीप काकडे,नीलेश आरू, रवि तांबट,तेजस अलोने,सूरेश काजले,गजानन काले, आकाश पावडे,इकबाल शाह,गजानन केटी,भिमराव शिरसाठ,सचिन तायडे,समीर पठाण,ओमशिव राठोड, जयसिंग राठोड,प्रशांत काकडे,प्रभाकर नागपूरे,श्रीकांत काकडे,भुषन कराळे,निलेश कराळे,सागर कराळे,अमोल इंगळे,देवानंद वासनिक,शंकर तिजारे,सुरेश तिजारे, अभिजीत तायडे,गजानन काळे,सुरेश काजले,रवी गझलवार,स्वप्नील पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

युवसेनेतर्फे लसीकरण शिबीराचे आयोजन
शिवसेना शाखा बोरी तर्फे युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी गिरीजानंद कळंबे व युवासेना उपतालुका युवा अधिकारी राहुल लहाडके यांचे पुढाकारात बोरी येथील दत्त मंदिर येथे माननीय आमदार संजय राठोड यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिरात अठरा वर्षावरील सुमारे एकशे पन्नास नागरिकांचे लसीकरण झाले.तसेच ह्याच उपक्रमाच्या माध्यमातून रक्त तपासणी शिबीर सुद्धा घेण्यात आले.ह्या शिबिरात एकशे चाळीस नागरिकांनी रक्त तपासणी करून घेतली. ह्या कार्यक्रमात बोरी येथील सामाजिक कार्यकर्त्या नसीमबाई बानो व प्राध्यापक शोएब शेख तसेच युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत व युवसेनेत प्रवेश केला.ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात गिरीजनांद कळंबे,राहुल लहाडके,सागर गुल्हाने,सुमित हिवरकर, विक्रम अग्निहोत्री, विद्यार्थी सेना उपशहर प्रमुख शंतनु राठोड, विद्यार्थी सेना सचिव प्रतीक गोमासे, शुभम इंगोले प्रशांत टाले,ओमकार गावंडे, सागर काकडे, साहिल अजमिरे, शिवेंद्र राजगुरे ,वैभव डाके पवन परमार,अक्षय इंदाने, कौतुक गावंडे ,तेजस गिरी, तेजस शहाकार, प्रज्वल टेकाम,ज्ञानेश्वर गौरकर,निखिल राऊत यांनी विशेष योगदान दिले.

ह्या कार्यक्रमाला माजी मंत्री व आमदार संजय राठोड,शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार,जिल्हा परिषद सभापती श्रीधर मोहोड,शिवसेना तालुका प्रमुख संजय रंगे,ह.भ.प. बडे महाराज,युवासेना जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा,अभ्यागत मंडळ सदस्य विकास क्षीरसागर,ग्रामपंचायत सदस्य सौ ज्ञानेश्वरी कळंबे,यशवंत पवार सर,राहुल गंभीरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here