Home Breaking News क्रांतीवीर बिरसा मुंडा सांस्कृतिक भवनाच उद्घाटन…

क्रांतीवीर बिरसा मुंडा सांस्कृतिक भवनाच उद्घाटन…

62
0

नगरसेविक दर्शना इंगोले यांचा पुढाकार, माजी शिक्षणमंत्री तथा आदिवासी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.

यवतमाळ :आदिवासी समाज बहुउद्देशीय संस्था उमरसरा (नविन) यांच्या वतीने क्रांतीवीर बिरसा मुंडा सांस्कृतिक भवनाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा रविवार, दि. २७ जुनला उमरसरा ग्रामपंचायत परिसरात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री तथा आदिवासी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके तर उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा कांचन चौधरी, नगरसेवक चंद्रशेखर चौधरी, नगरसेविक दर्शना इंगोले, माजी जि.प.सदस्य भारती इंगोले,नगरसेवक छोटू पावडे  , सुरेश कन्नाके, गुलाबराव कुडमेथ, राजु चांदेकर, दिलीप शेडमाके, पवनकुमार आत्राम, डॉ. हरिश धुर्वे, निनाद सुरपाम, जितेश नावडे, वीक्की राऊत, आशिष फाळके , अंकुश पवार, राजू मेश्राम, बाळु वट्टी आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या फोटोचे आणि सांस्कृतिक भवनाचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी कोरोना मृत्यू झालेल्या कुटुंबासाठी निःशुल्क बिछायत, खुर्ची, ॲक्वा, मॅटचे लोकार्पण फित कापुन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग क्रमांक २२ च्या नगरसेविका दर्शना इंगोले यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातुन २२ प्रभागांमध्ये आपल्या हातुन आदिवासी समाजासाठी क्रांतीवीर बिरसा भवन झाल्याचा योग आल्याचा आनंद झाला असे सांगितले. यावेळी कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणूण काम करणारे कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स, कोया पुनेम गोटुल समिती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी समाज बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने दिलीप उईके यांनी आदिवासी समाज भवन मोकळ्या परिसरात बांधण्यासंदर्भात निवेदन मान्यवरांना दिले. आदिवासी समाजाच्यावतीने क्रांतीवीर बिरसा मुंडा बहुउद्देशीय मंडळ, आर्णी नाका यांच्यावतीने नगरसेविका दर्शना इंगोले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर उईके यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन कोटनाके यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here