Home Breaking News कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस...

कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस साजरा..

36
0

राष्ट्रवादी युवती काँग्रेस व कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आयोजन

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय संदीपभाऊ बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला..
कळंब वॉर्ड न 17 स्वप्न नगरी मध्ये सकाळी वृक्षारोपण करून सुरुवात करण्यात आली…धोत्रा येथे माऊली वृद्धश्रमात , केक कापून व त्यांना जीवना आवश्यक वस्तू देऊन वाढदिवस माऊली वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला.. यावेळी सुधाकरराव निखाडे तालुकाध्यक्ष कळंब(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सारिका ताई ताजने, माजी सभापती लताताई खादवे, रजनी ताई देवकते ,मनिषा काटे (भोसले) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस तथा उपसरपंच ग्रामपंचायत मावळणी , मनोज पिसे
तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस),चंद्रकांत ताजने, राष्ट्रवादी महिला किसान सेल च्या जिल्हाध्यक्षा सारिकाताई ठोंबरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका कार्यकारिणीचे सदस्य निखील आसुटकर, अक्षय राऊत, मनोज ढगे, तसेच अभय कांबळे, लक्ष्मणराव ढाले, शुभांगी चांदोरे,तन्वीर अलि सैयद, गणेश नागोसे, गोपाल उचाडे, विक्की फुलमाली, मोरेश्वरराव फुसे, तेजस कांबळे, पडोळे ताई, शेंडे ताई, कांबळे ताई, जगताप ताई, सुमन ढाले, प्रदीप बोबडे, मान्ना मोरे, सुमित सोनवणे, गौरव मोरे इत्यादी उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here