Home Breaking News मा. आमदार श्री. बोदकुरवार यांच्या हस्ते प्रफुल भोयर यांचा रक्तदान क्षेत्रातील बहुमोल...

मा. आमदार श्री. बोदकुरवार यांच्या हस्ते प्रफुल भोयर यांचा रक्तदान क्षेत्रातील बहुमोल कार्याबद्दल गौरव..

130
0

यवतमाळ: १ जुलैला कृषीदिन सर्वत्र संपन्न झाला. कृषिदिनाचे औचित्य साधून मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री राजेश पांडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व सामाजिक कार्यात विशेष योगदान देणार्या देशभक्त समाज सेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वणी विधानसभेचे आमदार श्री. संजीव बोदकुरवार यांच्या हस्ते झाली. कार्यक्रमात तहसीलदार श्री पुंडे, पंचायत समितीचे सभापती व सदस्य, चोपणे विद्यालयाचे मुख्याध्यापक व मान्यवर उपस्थित होते. शिबिरात अनेक तरुणांनी रक्तदान केलं. यावेळी रक्तदान क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन होईल ती मदत करणारे प्रफुल भोयर उपस्थित होते. यावेळी आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते प्रफुल भोयर यांचा शाल, शिल्ड आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार बोदकुरवार यांनी प्रफुल च्या कार्याचे कौतुक केले. प्रफुल भोयर हे रक्तदान क्षेत्रात काम करतात. यापूर्वी ते अनेक पुरस्काराने सन्मानित आहे. त्यांच्या दररोजच्या कार्यामुळे कित्येक गरजूंचे जिव वाचतात यातून तरुणांना प्रेरणा मिळते.
प्रफुल भोयर हे म्हणेन तेव्हा मागेल तिथे रक्तसंबंधीत रुग्णांसाठी वेळेत रक्तदाता उपलब्ध करून देतो, समाजातल्या तरुणांना एक विशिष्ट शृंखलेत बांधून हवे तेव्हा रक्तदानासाठी तयार करणे, याला आत्मिक कौशल्य पाहिजे. त्या कौशल्यातुन प्रफुल भोयर यांनी केलेले कार्य मानवतेच्या हिताचे सर्वोच्च कार्य आहे. या कार्याची दखल घेत छत्रपती प्रतिष्ठान बोटोनीचे राजेश पांडे यांनी प्रफुल भोयर यांना सत्कारासाठी निमंत्रित केले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती प्रतिष्ठान चे राजेश जी पांडे व समस्त गावकरी यांनी मोलाचे प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here