Home Breaking News प्रभाग क्र १७ मधील नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी स्वत:हून पुढे येण्याचे सौ.मिनल...

प्रभाग क्र १७ मधील नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी स्वत:हून पुढे येण्याचे सौ.मिनल पांडे यांचे आवाहन..

169
0

यवतमाळ जिल्ह्यात २१ जून पासून १८ वर्ष वयोगटावरील सर्व नागरिकांना कोविड ची लस देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. यवतमाळ शहराला शासनाच्या सूचनेनुसार आता कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस उपलब्धतेनुसार पहिल्या व दुसऱ्या दोन्ही डोज साठी वापरण्यात येणार आहे. नागरिकांना आपले ओळख पत्र दाखवून किंवा आधीच कोविन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन दोन्ही पद्धतीने लस घेता येईल.

दि‌.०३ जुलैपासून कोविड लस डोजची विशेष मोहीम अनेक केंद्रांवर राबविले जाणार असून त्यामध्ये सामान्य नागरिकांनी सहभागी होऊन कोरोनाला टक्कर देण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.सदर मिशन ३०००० अंतर्गत कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध राहणार आहेत सदर मिशन अंतर्गत नागरिकांना प्रथम आणि द्वितीय दोन्ही डोजेसची सुविधा उपलब्ध राहणार आहे. प्रभाग क्र १७ मधील शिवाजी नगर, शिंदे प्लाॅट, बब्बी पहेलवान चौक, टिळकवाडी, वीर वामनराव चौक या परिसरातील नागरिकांसाठी गोधडीवाला धाम (सिंधी कॅम्प) या ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. आगामी काळामध्ये येऊ घातलेल्या कोरोना तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी सदर लसीकरणामध्ये प्रभाग क्र १७ मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक जबाबदारी म्हणून उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या सौ.मिनल पांडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here