Home Breaking News भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात मात्र भूकंपाचे धक्के जाणवले नांदेड जिल्ह्यात …

भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात मात्र भूकंपाचे धक्के जाणवले नांदेड जिल्ह्यात …

271
0

कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही

नागरिकांनी घाबरून जाऊ नये

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ,दि11 : आज सकाळी 8:33 मिनिटांनी नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सेसमोलॉजीच्या संकेतस्थळावर आहे. मात्र केंद्रबिंदूच्या ठिकाणी आणि इतर आजूबाजूच्या गावांमध्ये भूकंपाचे कोणतेही धक्के जाणवले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच कोणतीही हानी झालेली नाही. महागाव तहसिलदार आणि त्यांची चमू यांनी गावांमध्ये भेट दिली असून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here