Home Breaking News प्रभाग क्र १७ येथील स्ट्रिट लाईट बंद अवस्थेत नगर पालिकेच्या विद्युत विभागाचे...

प्रभाग क्र १७ येथील स्ट्रिट लाईट बंद अवस्थेत नगर पालिकेच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष..

83
0

यवतमाळ: पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सरपटणारे प्राणी फिरतात झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक भागात नागरिकांच्या घरासमोर अंधार पाहायला मिळते आहे मध्यंतरीच्या काळात विद्युत विभागाने नगर पालिकेचे स्ट्रिट लाईटचे कनेक्शन कापले होते त्यामुळे परिसरातील बंद पडलेले पथ दिवे दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

नगर पालिकेच्या पथदिवे दुरुस्तीचे काम हे कंत्राटी पद्धतीने दिले आहे ते काय काम करत आहे हे पाहावे ही नगर पालिकेची जबाबदारी आहे अनेकदा तक्रारी करुनही लाईट दुरुस्तीचे काम होत नसल्याने नेमके कोण काम करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रभाग क्र १७ येथील काही भागातील लाईट बंद असल्याची तक्रार सौ.मिनल पांडे यांनी केली होती. परिसरातील मोठे हायमास्ट लाईट अर्ध चालू तर अर्ध बंद अवस्थेत आहे तर काही लाईट पुर्ण पणे बंद पडले आहे. तसेच काही विद्युत पोल वरिल लाईट बंद असल्यामुळे लाईट ची वायर तुटल्याने रस्त्यावर लोंमकत असुन कधी जमीनीवर कोसळेल याचा नेम नाही. रस्त्यावर नेहमीच रहदारी असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे या हायमास्ट लाईट व विद्युत पोल लाईट ची दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.नगर पालिकेच्या विद्युत विभागाने तात्काळ लक्ष घालून परिसरातील लाईटची दुरुस्ती करावी अशी मागणी सौ.मिनल पांडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here