Home Breaking News यवतमाळ पोलिसांच्या औदार्याने मिळाले रुग्णांना जीवनदान.

यवतमाळ पोलिसांच्या औदार्याने मिळाले रुग्णांना जीवनदान.

132
0

◆ प्रफुल च्या प्रयत्नातुन १२ जणांचे वाचले रक्तदानाने प्राण.

यवतमाळ : कोरोनाची लाट ओसरली असली तरी धोका टळलेला नाही. या भीतीमुळे रक्ताचा तुटवडा सर्वत्र आहे. काही रुग्णांना रक्त वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे चित्र दिसुन येत आहे. रक्ताची गरज असल्याची मागणी प्रफुल भोयर ला होत होती. कोविडची भीती, मनातील गैरसमज व व्हँक्सिन मुळे रक्तदाते रक्तदानासाठी तयार होत नसल्याचे पाहून प्रफुल भोयर यांनी यवतमाळ पोलिसांकडे मदत मागितली. सळसळत्या रक्ताच्या यवतमाळ पोलिस फोर्सच्या कॉप्सने कामातुन वेळ काढत त्वरीत होकार कळवला.
जनतेच्या सेवेसाठी सदैव तयार असलेले यवतमाळ पोलीस आजही रुग्ण मदतीला धावून आले. यशवंत गिरी, सुनिल नलगंटीवार, मोनेश्वर खंडरे, चेतन राठोड या पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केलं व आपल्या रक्तदानातून मानवतेसाठी औदार्य दाखवलं. या वेळी राहुल भोयर व प्रफुल भोयर उपस्थित होते.
रक्त हा असा विषय आहे की याची गरज रुग्णांना वेळोवेळी पडत असते. रक्ताच्या कमतरतेमुळे मानवी शरीराला गंभीर परिणाम भोगावे लागतात. रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी रक्तपेढीला रक्तदात्यांवरच अवलंबून राहावे लागते. यवतमाळ रक्तपेढी गृप चे समन्वयक प्रफुल भोयर ला कळताच यांनी तात्काळ मदतीचे आवाहन केले. पर्याय म्हणुन यवतमाळ पोलिसांना मदतीची मागणीही घातली होती. यावरील प्रतिसाद म्हणून ऑन ड्युटी युवक पोलीस रक्तवीर प्रफुल च्या सहकार्याने रुग्णाच्या मदतीला गेले आणि मानवतेच्या दुनियेत दातृत्वाचा तुरा रोवला. त्यांच्या कार्यामुळे स्वयंस्फूर्तीने केलेल्या सात्विक दानातून तरुणांना प्रेरणा मिळते. अडचणीच्या काळात गरीब गरजु रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण होण्यासाठी प्रफुल भोयर ने रक्तदानासाठी तरुणांना आवाहन केलं आहे.

अभिप्राय:-
१) रक्तदान हे जीवनदान आहे. रक्तदानामुळे अनेक जीव वाचविले जातात. रक्ताची गरज लक्षात घेता अधिकाधिक लोकांनी रक्तदानासाठी पुढे यावे.
– राहुल भोयर ( शासकीय रक्तपेढी तंत्रज्ञ यवतमाळ )

२) रक्तदान ही काळाची गरज आहे. रक्तदानाने दुहेरी फायदा आहे. यामुळे रुग्णांना जीवनदान मिळते. रुग्णांचे अश्रु पुसण्यासाठी प्रत्येकाने रक्तदान करा.
– सुनिल नलगंटीवार ( QRT पथक जिल्हा पोलीस )

३) मी दर तीन महिन्याने रक्तदान करत असतो. रक्ताविना कुणाला आपले प्राण गमवावे लागु नये म्हणुन केलेला हा माझा आत्मिक प्रयत्न आहे.
– मोनेश्वर खंडरे ( QRT पथक जिल्हा पोलिस )

४) चांगल काम आपल्या हातुन घडावे. यासाठी मी रक्तदान करत असतो. जनसेवेची ही अमूल्य संधी मला पकडता आली याचे मला समाधान आहे. Give Blood Save Life.
-चेतन राठोड ( यवतमाळ पोलिस )

५) मी नियमित रक्तदाता आहे. रक्तदाते मिळत नसल्याने सामाजिक जाणिवेतून गरजूंना मदत करण्याचा छोटासा प्रयत्न मी केला आहे.
– यशवंत गिरी ( यवतमाळ पोलिस )

६) दाता हा नेहमीच महान असतो. जीव वाचविण्याच्या कार्यात रक्तदात्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे. आज यवतमाळ पोलिसांच्या मदतीने रक्ताची मोठी गरज पूर्ण झाली. ही रक्तदान क्षेत्रातील प्रेरणादायी बाब आहे.
– प्रफुल भोयर ( समन्वयक जिल्हा रक्तपेढी ग्रुप )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here