Home लातूर लातूर जिल्ह्यातील रस्ते तातडिने दुरुस्ती करा!: पालकमंत्री अमित देशमुख

लातूर जिल्ह्यातील रस्ते तातडिने दुरुस्ती करा!: पालकमंत्री अमित देशमुख

134
0

लातूर जिल्हा पाटबंधारे विकास आढावा बैठकीत निर्देश

लातूर : जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. चांगले रस्त्यामुळे दळणवळण अत्यंत गतिमान होते. त्यामुळे सर्व अंतर्गत व बाह्य रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे  तात्काळ पूर्ण करावीत. शहरातील व बाहेरील रहदारी कमी करण्यासाठी मोठे पूल आणि रस्ते बांधण्यासाठी रस्ते विकास विभागाने तात्काळ आराखडा तयार करून सादर करावा, असे निर्देश शासकीय विश्रामगृहातील आयोजित लातूर जिल्हा रस्ते विकास व  लातूर जिल्हा पाट्बंधारे विकास आढावा बैठकीत दिले आहेत.

यावेळी मुख्य अभियंता पी. के. सिंह व अभियंता मुरलीदर चित्रीयेर्ला, सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस.जी गंगथडे, प्रोजेक्ट डायरेकटर सुनील पाटील, लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता रुपाली ठोंबरे, जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.

रस्त्यांना त्यांच्या आवस्थेनुसार वर्गीकृत करून खराब रस्त्यांना तात्काळ दूरुस्त करावे DEFECT LIABILITY PERIOD नुसार खराब रस्त्यांना तेंव्हाच दुरुस्त करणे अपेक्षित असते. त्यामुळे डीएलपी चा अवलंब करून जिल्ह्यातील सर्व नादुरुस्त रत्यांना दुरुस्त करण्याचा मानस सर्व अधिका-यांनी दाखवणे गरजेचे आहे, जेणे करून नागरिकांना चांगले रस्ते देण्यात आपण यशस्वी होऊ शकतो असे सांगीतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here