Home Breaking News नगरसेवक, नगराध्यक्षांना मेडिकल पॉलीसी लागू करा : आमदार डॉ. वजाहत मिर्झा

नगरसेवक, नगराध्यक्षांना मेडिकल पॉलीसी लागू करा : आमदार डॉ. वजाहत मिर्झा

85
0

आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे

पुसद : संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजविलेला आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादूर्भाव वाढत चालला आहे.  परिणामी, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिवाची पर्वा न करता २४तास राबणाऱ्या नगरपालिका व नगर पंचायतीतील सर्व अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक यांना कोरोनाची लागण होऊ शकते, या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल पॉलीसी काढण्याची आवश्‍यकता आहे. या गंभीर बाबीची दखल घेत, आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी बुधवारी (ता. १६)ला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून पॉलीसी काढण्याबाबत मागणी केली आहे.

राज्य शासनाने निर्देशित केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी नगर पालिका व नगर पंचायतीतील सर्व अधिकारी , कर्मचारी व नगर सेवक स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या महामारीचा सामना करतांना बरेचसे अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांना कोरोंनाची लागण झाली. काहींनी यावर मात ही केली तर काहींना आपला जीव गमवावा लागला .  सर्व कर्मचाऱ्यांसाठी शासनामार्फत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेडिक्लेम पॉलिसी केलेली आहे. या सर्व परिस्थितीत समाजाचा महत्वाचा घटक म्हणून नगरसेवक सुद्धा त्यांच्या सोबत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रत्येक स्तरावर प्रशासनाच्या सोबत काम करीत आहेत यामध्ये नगर सेवक सुद्धा बाधित होत आहेत. त्यामुळे त्यांची सुद्धा मेडिक्लेम पॉलिसी करणे अतिशय गरजेचे आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगर पालिका व नगर पंचायतीतील अध्यक्षासह सर्व नगरसेवकांचे व त्यांच्या कुटुंबाचा विचार करून मेडिक्लेम पॉलिसी लवकराव लवकर काढावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here